घरठाणे...आणि ते पुन्हा 'लग्नाच्या बेडीत' अडकले

…आणि ते पुन्हा ‘लग्नाच्या बेडीत’ अडकले

Subscribe

लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी मुलींची आईवडिलांना अनोखी भेट

वाढदिवस म्हटलं की पार्टी, अवाढव्य खर्च, आतिशबाजीतून केली जाणारी पैशांची उधळपट्टी हे समीकरण सध्याच्या काळात नित्याचेच झाले आहे. मात्र वाढदिवशी आश्चर्याचा सुखद धक्का मित्र, मैत्रिणी, मुलं, नातवंड देतात. अंबरनाथ मधील तांबे दाम्पत्यांच्या मुलींनी देखील आपल्या आई-वडिलांना ५० व्या लग्नाच्या वाढदिवशी एक अनोखे सरप्राईज दिले आहे.  सजलेला मंडप, सनईचे सूर, जवळ येऊन ठेपलेला मुहूर्त आणि करवल्यांची लगबग. विशेष म्हणजे या करवल्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हत्या तर त्या होत्या नवरी आणि नवरदेवाच्या मुली आणि नाती. निमित्त होते ते अंबरनाथच्या लक्ष्मण तांबे आणि वनिता तांबे यांच्या विवाहाचे, तसे पाहिले तर आजपासून ५० वर्षांपूर्वी हे दाम्पत्य लग्नाच्या बेडीत अडकलं होतं. आज त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस होता पण याच दिवशी आई वडिलांना वेगळं सरप्राईज द्यायची कल्पना त्यांच्या मुलींच्या डोक्यात होती. मग मंडप सजला, नातेवाईकांना निमंत्रण पाठवले आणि लग्नाच्या ५० व्या वाढदिवशीच तांबे दाम्पत्याचा विधिवत विवाहसोहळा पार पडला.
वधूने वराच्या गळ्यात वरमाळा घालताच उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि ५० वर्षानंतर पुन्हा हे दाम्पत्य मुली, जावई, व्याही, विहीनबाई आणि डझनभर नातवंड यांच्या साक्षीनं विवाह बंधनात अडकले. विशेष म्हणजे यावयातही नवरदेवाच्या बहिणीनं करवलीची भूमिका चोख पार पाडली. या अनोख्या विवाहसोहळ्याला डेन एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड, मनसेचे ठाणेजिल्हा संघटक संदीप लकडे, पल्लवी लकडे, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, किरण सासे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -