घरठाणेआमदार आव्हाडांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण 

आमदार आव्हाडांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण 

Subscribe

निकाल ठेवला ३ मार्चपर्यंत राखून

वादग्रस्त महापालिका अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिलेल्या तक्रारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कट रचून आपल्या जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांमार्फत मारहाण झाल्याचे नमूद केले. या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्या अर्जावरील दोन्ही बाजूचा युक्तिवाद मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. मात्र त्याचा निकाल येत्या ३ मार्चपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.  डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपविण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले, अशी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट क्रमांक ४ च्या बाहेर बेदम मारहाण केली. याप्रकरणी आमदार आव्हाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर  चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्यानंतर आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार होती. त्यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज केला.

त्यावेळी त्यांना अंतरिम जमीन मंजूर झाला होत्या. त्या जामीन अर्जावर मंगळवारी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने तो निकाल येत्या ३ मार्च राखून ठेवला आहे. त्यामुळे ३ मार्चपर्यंत आव्हाड यांना दिलासा मिळाला असून त्याचदिवशी त्यांना अटक होणार की जामीन मंजूर होणार ते पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

त्या राष्ट्रवादीच्या चार पदाधिकाऱ्यांना जामीन मंजुर
महापालिका सहायक आयुक्त महेश आहेर यांची  कथीत ऑडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर केलेल्या मारहाण केली. त्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्र म खामकर, हेमंत वाणी आणि विंशीत गायकवाड यांना अटक झाली होती. त्या चौघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -