घरठाणेठाणे जिल्हातील कलाकारांना एकरकमी आर्थिक सहाय्य मिळणार

ठाणे जिल्हातील कलाकारांना एकरकमी आर्थिक सहाय्य मिळणार

Subscribe

अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने एकरकमी पाच हजार आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ठाणे जिल्हातील दोन हजार कलाकारांना या अर्थसहाय्याचा लाभ देण्यात येणार असून यासाठी  कलाकारांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
कलाकारांनी हे अर्ज नजिकच्या तहसीलदार कार्यालयात सादर करायचे आहेत. यासाठी लागणारा अर्जाचा नमुना सर्व तहसीलदार कार्यालय तसेच www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एकरकमी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी शासनाने ठरविलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे इष्ट आहे. एकल कलाकार सहाय्यासाठी कलेच्या क्षेत्रात १५ वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, महाराष्ट्रात १५ वर्ष वास्तव, वार्षिक उत्पन्न ४८ हजारांच्या कमाल मर्यादेत असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

कलाकारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जावर छाननी समिती अर्जांची पडताळणी करेल त्यानंतरच पात्र कलाकारच्या निवड याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांस्कृतिक कार्य संचालनाकडे अर्थ सहाय्यासाठी सादर करण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.

या कलाकारांना याचा लाभ नाही
केंद्र आणि राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्यच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -