घरठाणेटोलनाक्यावर अधिकार्‍यांना राज ठाकरेंचा सज्जड दम

टोलनाक्यावर अधिकार्‍यांना राज ठाकरेंचा सज्जड दम

Subscribe

ठाणे । नाशिक दौरा आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे जवळील मुलुंड टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने वाहने रांगेत वाहतूक कोंडीमुळे अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे नेहमी प्रमाणे टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या लोकांना रस्ता करुन दिला आणि ठाकरे शैलीत टोलनाक्याच्या अधिकार्‍यांना सज्जड दम देऊन वाहतूक कोंडी काही क्षणात सोडववण्यात आली. यावेळी कित्येक वर्ष झाले ठाणे जवळील मुलुंड टोल नाक्यावरून कित्येक वर्षापासून गाड्या जात आहेत, या टोलनाक्याने कित्येक वसुली केली, यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचे यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -