घरठाणेठाण्यात पाण्याच्या टाकीत गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

ठाण्यात पाण्याच्या टाकीत गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

Subscribe

ठाण्यात इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टाकी साफ करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी चार जण टाकीत कोसळले, यातील दोन कामगारांचा टाकीत गुदमरून मृत्यू झाला आहे. ठाण्यातील नौपाडा येथील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीत हे कर्मचारी सफाईचे काम करत होते. दरम्यान जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. केमिकलमुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून या 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विवेक कुमार (३०), योगेश नरवणकर (३८), गणेश नरवणकर (३०) आणि मिथून ओझा (३६) अशी या कामगारांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, दरम्यान पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. नौपाडा पोलिसांच्या माहितीनुसार, मराठा सेवा मंडळाच्या इमारतीमध्ये घटना घडली आहे. या इमारतीची पाण्याची टाकी साफ करण्याचं कंत्राट एका ठेकेदाराने घेतले होते. सकाळी 11 च्या सुमारास कामगारांनी काम सुरु केले. यावेळी पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत केमिकल टाकण्यात आले होते. यावेळी दोन कामगार टाकी साफ करण्यासाठी उतरले. या दोन्ही कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आरड-ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपस्थित इतर दोन कामगारांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, यातील चारपैकी दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेप्रकरणी संबंधित ठेकदाराची चौकशी केली जात असून पुढील तपास सुरु आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -