घरठाणेरेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा; IRCTC कर्मचाऱ्याला पोलिसांकडून बेड्या

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा; IRCTC कर्मचाऱ्याला पोलिसांकडून बेड्या

Subscribe

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने कित्येक जण बेरोजगार झाले. त्यामुळे कित्येकांवर आर्थिक संकटदेखील ओढावले. घराची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी आता अनेक जण मिळेल ती नोकरी धंदा करण्याच्या तयारी आहे. मात्र अशा परिस्थितीत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली तरूणांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश अंबरनाथ पोलिसांनी केला आहे. या टोळीतील एका तरूणाने रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघडकीस आणला असून या प्रकरणात IRCTC च्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

असा घडला प्रकार

या IRCTC कर्मचाऱ्याचे नाव कैलास राजपाल सिंह असून तो कैलास आयआरसीटीसीच्या चर्चगेट स्टेशनवरील कँटीनमध्ये काम करत होता. त्याने बदलापूरात राहणारा कुमार चव्हाण हा तरूण नोकरीच्या शोधत असल्याचे त्याला समजले. कैलास राजपाल सिंग या भामट्याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने बनावट प्रश्नपत्रिका, खोटी परीक्षा आणि खोटी मुलाखत घेऊन पास करून घेण्यासाठी ५ लाख रूपये कुमार चव्हाण या तरूणाकडून उकळल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर आपली रेल्वेतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे असे सांगून त्याला बनावट ऑफरलेटरही तयार करून दिलं. या सगळ्या प्रकारानंतर घडत असलेला प्रकार खोटा असून आपली फसवणूक होत असल्याचे समजताच कुमारने पोलिसात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, केलास हा दोन ते तीन महिन्यांना त्याचं वास्तव्य बदलायचा. यावेळी तो विरारला असताना त्याच्या ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं असून अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना रेल्वेत नोकरी देण्याचं अमिष दाखवणाऱ्या कैलाशसह रेल्वेचे दोन अधिकारीसुद्धा सहभागी असल्याचे समोर आले. केलाश पोलिसांच्या जाळ्यात अडकला असला तरी या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.


मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण: सुप्रिया सुळेंनी लिहिलं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -