घरठाणेशंभर टक्के मालमत्ता कर वसुली करा

शंभर टक्के मालमत्ता कर वसुली करा

Subscribe

ठाणे महापालिका आयुक्तांचे कडक निर्देश

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच १०० टक्के वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कर निरीक्षक यांना दिले. दरम्यान प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कर आकारणी न झालेल्या नवीन मालमत्तांचा शोध घेवून तात्काळ एका आठवड्यात कर आकारणी करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व संबंधितांना दिले.

सोमवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीच्या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, ज्ञानेश्वर ढेरे कार्मिक अधिकारी जी.जी.गोदेपुरे, उप कर निर्धारक व संकलक अनघा कदम, दिनेश तावडे तसेच सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आदी उपस्थित होते.

- Advertisement -

आज अखेर अंदाजे ४८०.५० कोटी रुपये मालमत्ता कराच्या स्वरूपात वसुली झाली आहे. सदरची वसुली ही निर्धारित इष्टांकाच्या ६५ टक्केपेक्षा जास्त झाली आहे. जवळपास १०, ८७, ०४० मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या एकूण १७६ ब्लॉकमधील सर्वच नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी प्रभाग समिती निहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिका-यांना दिल्या.

यासोबतच प्रभाग समितीनिहाय कर वसुलीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त व कर निरीक्षक यांना दिले. तसेच प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कर आकारणी न झालेल्या नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेवून तात्काळ एका आठवड्यात कर आकारणी करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व संबंधितांना दिले. त्याचप्रमाणे ब्लॉकनिहाय थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राधान्य  देण्याच्या सूचना देतानाच पहिल्या सहामाहीमधील थकबाकीदारांकडील वसुली करण्यावर भर देण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -