घरठाणेनगरसेवक अमेय घोले यांचा शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

नगरसेवक अमेय घोले यांचा शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Subscribe

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाचे नगरसेवक अमेय घोले (Amey Ghole) यांनी युवासेनेतील पदाचा राजीनामा देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी वारंवार कामात अडथळे निर्माण केल्याचे आरोप करत अमेय घोले यांनी राजीनामा दिला आहे. (I left the party because of Shraddha Jadhav Suraj Chavan says thackeray group corporator Amey Ghole).

यावेळी अमेर घोले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा नारा देत आहेत, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज माझ्यासोबत शासकीय आणि विधानसभेच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहोत. मुख्यमंत्री जी काही काम आज करत आहेत ती नेहमीच करत राहतील अशी आशा व्यक्त करतो. माझ्यासोबत वडाळ्याचे नागरीक आज या ठिकाणी आले आहेत त्यांचे 25 ते 30 वर्षे घराचे प्रकल्प रखडले आहेत ते तुम्ही सोडवावे आणि त्याची पोचपावती म्हणून आज आपण निर्णय घ्यावा, अशी विनंती अमेय घोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी वारंवार कामात अडथळे निर्माण केल्याचे आरोप करत अमेय घोले यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याबाबत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रातून अमेय घोले यांनी राजीनामा दिला आहे. याशिवाय, आपलं महानगरशी बोलतानाही अमेय घोले यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच, ‘पुढे काय होतं हे पाहू’, असेही त्यांनी सांगितले होते.


अमेय घोलेंच्या पत्रात काय?
मी राजकारणात आलो तुमच्यामुळे. तुम्ही माझ्या वर विश्वास दाखवलात आणि मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेले १३ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडली. परंतु वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला संघटक मा. सौ. श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला.
याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे व मला सुरळीतपणे माझे कार्य सुरू ठेवता यावे म्हणुन मी खूप प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे आज अखेरीस जड अंतःकरणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. सांगण्यास अत्यंत दुःख होत आहे की आज मी माझ्या युवासेनेच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.
आदित्य जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -