घरठाणेप्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे

प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे

Subscribe

कृषि सहसंचालक अंकुश माने

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी एम किसान) अंतर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई केवायसी प्रमाणीकरण करणे तसेच भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे माहिती अद्यावत करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

राज्यात सद्य:स्थितीत जवळपास ११ लाख व १९ लाख लाभार्थींची अनुक्रमे बँक खाते आधार संलग्न करणे व ई केवायसी करणे प्रलंबित आहेत. ज्या लाभार्थीचे ई केवायसी व बँक खाती आधार संलग्न झाली नाहीत, त्यांना योजनेचा पुढील हप्ता अदा होणार नाही. केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे राज्यात १ मे पासून जिल्हाधिकारी महोदयांच्या नियंत्रणाखाली गावपातळीवर यासंदर्भात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांने प्रधानमंत्री किसान पोर्टलवरील फार्मर कॉर्नरमधील ई केवायसी ओटीपी आधारित सुविधेद्वारे अथवा सामायिक सुविधा केंद्रामध्ये (सीएससी)  अथवा पी एम किसानच्या नवीन ॲपद्वारे चेहरा ओळख (फेस डिटेक्शन) माध्यमातून ई-केवायसी प्रमाणीकरण करावे.

- Advertisement -

तसेच संबंधित लाभार्थ्याला जर बँक खाते आधार संलग्न करायचे असेल तर त्याने त्यांच्या बँकेत जाऊन बँक खात्यास आधार संलग्न करावा किंवा पोस्टमास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते उघडावे. लाभार्थ्याचे जर भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे अद्यावतीकरण करायचे असल्यास त्याने आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे गावच्या तलाठी अथवा संबंधित तहसील कार्यालयास संपर्क साधून सर्व बाबींची पूर्तता करावी व १४ व्या हप्त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी सहसंचालक माने यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -