घरठाणेसांडपाण्यावर मायक्रोऑर्गनिझम टेक्नोलॉजीचा प्रयोग

सांडपाण्यावर मायक्रोऑर्गनिझम टेक्नोलॉजीचा प्रयोग

Subscribe

एमआयडीसीत प्रकल्प राबवण्याचा विचार

डोंबिवली एमआयडीसी मधील जवळपास ९० टक्के कारखान्या मध्ये केमिकल मिश्रित सांडपाणी हे सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यत वाहून आणताना एमआयडीसीचे नाले उघडे असल्यामुळे नागरिकांना प्रदुषणाचा त्रास होतो. औरंगाबाद येथील यश फाउंडेशन यांनी तयार केलेल्या बायोनेस्ट पद्धतीचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सुरुवातीला १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कामाकडून हा प्लांट उभारला जाईल आणि त्याच्या निकालाचे निरीक्षण केल्यानंतर एमआयडीसी मधील जास्तीत जास्त कंपन्यामध्ये हा प्लांट कार्यान्वित केला जाणार आहे.

संपूर्णपणे नैसर्गिक रित्या होणाऱ्या या शुधीकरण प्रकल्पात विजेचा किंवा कोणत्याही महागड्या मशिनरीचा वापर केला जात नसल्यामुळे ही कमी खर्चिक आणि लाभदायक प्रक्रिया ठरणार असल्याचे कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले. पुणे,औरंगाबाद नंतर डोंबिवलीतील सांडपाणी प्रकिया केंद्रात हा प्रयोग राबविला जाणार आहे. गुरुवारी डोंबिवलीतील सांडपाणी उदंचन प्रकिया केंद्रात या प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
यावेळी औरंगाबाद येथील यश फाउंडेशनचे संचालक यश पटेल, नरेद्र पटेल, कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, सदस्य उद्य वालावलकर, राजू बैलूर, डॉ. आनंद आचार्य, व्ही.के.कन्नन, श्रेयस आचार्य, ऋषभ बैलूर, आनंद जयवंत, अमेय कामत, मुरली अय्यर, नारायण टेकाडे, डॉ. निखील धूत, कमल कपूर, चांगदेव कदम आणि राहुल कासलीवाल उपस्थित होते.

- Advertisement -

डोंबिवली सांडपाणी उदंचन प्रकिया केंद्रात डोंबिवली एमआयडीसी मधील कारखान्यामधील केमिकल मिश्रित सांडपाणी तयार होते. या सांडपाण्यावर एकत्रित पणे उदंचन केंद्रात प्रक्रिया करून ते खाडीत सोडले जाते. सांडपाणी उद्चन केंद्रात दररोज १५ लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात असून त्यासाठी दिवसाला १ लाख ५० हजार खर्च केला जातो. मात्र हे सांडपाणी केंद्रापर्यंत वाहून आणताना एमआयडीसीचे नाले उघडे असल्यामुळे नागरिकांना प्रदुषणाचा त्रास होतो. यामुळेच औरंगाबाद येथील यश फाउंडेशन यांनी तयार केलेल्या बायोनेस्ट पद्धतीचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविला आहे. या प्रक्रियेत सांडपाण्यातील रसायनांवर जगणाऱ्या सूक्ष्म जीवाचा वापर करण्यात आला आहे.

सूक्ष्मजीव मातीत मिसळवत कंपन्यातील घातक पाणी या प्लांटमध्ये ठरावीक प्रेशरने सोडले जाते. हे सूक्ष्मजीव सांडपाण्यातील केमिकल फस्त करतात. मातीत मुरलेले हे पाणी पुन्हा पाईपच्या मदतीने तशाच दुस-या आणि नंतर तिसऱ्या प्लांटमध्ये सोडले जाते. या प्रक्रियेत हे सूक्ष्मजीव सर्व प्रकारचे केमिकल आणि रंग देखील फस्त करतात. ज्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मर्यादेत किंवा त्यापेक्षा कितीतरी कमी प्रदूषित पाणी बाहेर पडते. सांडपाणी उद्चन केंद्राच्या परिसरात हा प्लांट प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आला असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास सुरुवातीला १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कामाकडून हा प्लांट उभारला जाईल आणि त्याच्या निकालाचे निरीक्षण केल्यानंतर एमआयडीसी मधील जास्तीत जास्त कंपन्यामध्ये हा प्लांट कार्यान्वित केला जाणार आहे. संपूर्णपणे नैसर्गिक रित्या होणाऱ्या या शुद्धीकरण प्रकल्पात विजेचा किंवा कोणत्याही महागड्या मशिनरीचा वापर केला जात नसल्यामुळे ही कमी खर्चिक आणि लाभदायक प्रक्रिया ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -