ठाण्यात 282 मतदारांची अंतिम मतदार यादी जाहीर

एकूण नव्या मतदारांची संख्या एक लाख 90 हजार 973

ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. मागील महिन्यात प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यावरील हरकती सूचना निकाली काढण्यात आल्या असून शनिवारी अंतिम मतदार यादी ठाणे महापालिकेने जाहीर केली आहे. यामध्ये प्रारूप यादीतील मतदारांपेक्षा अंतिम मतदार यादीत 282 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे मतदारांची संख्या एक लाख 90 हजार 973 वर गेली आहे. यामध्ये महिला मतदारांची 132 ने तर, पुरुष मतदारांची 150 ने वाढ झाली आहे.

निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अंतिम करण्याच्या सुचना ज्या ज्याठिकाणी निवडणुका आहेत, त्या ठिकाणच्या महापालिकांना देण्यात आल्या आहेत. त्यात 23 जून 2022 पालिकेच्या वतीने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत मे 2022 पर्यंतची मतदारांची संख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यानुसार मे अखेर पर्यंत सुमारे 13 लाख 90 हजार 691 मतदारांची नोंद झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. यामध्ये 7 लाख 45 हजार 424 एवढे पुरुष मतदार आहेत. तर, 6 लाख 45 हजार 167 इतकी महिला मतदारांची संख्याची नोंद झाली असून इतर मतदारांची संख्या 100 वर गेली आहे. तर, 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकाचा विचार केला तर त्यावेळेस 12 लाख 28 हजार 606 एवढे मतदार होते. त्यात 6 लाख 67 हजार 504 पुरुष तर 5 लाख 61 हजार 87 स्त्री मतदारांची संख्या होती. तर इतर 15 ही संख्या होती. यामध्ये मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदारांच्या संख्येत एक लाख 62 हजार 085 ने वाढ झाली आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादींवरील हरकती सूचना निकाली काढून शनिवार 16 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये यामध्ये प्रारूप यादीतील मतदारांपेक्षा अंतिम मतदार यादीत 282 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे मतदारांची संख्या एक लाख 90 हजार 973 वर गेली आहे. यामध्ये महिला मतदारांची 132 ने तर, पुरुष मतदारांची 150 ने वाढ झाली आहे. त्यामुळे पुरुष मतदारांची संख्या 7 लाख 45 हजार 574 तर,6 लाख 45 हजार 299 इतकी महिला मतदारांची संख्याची नोंद झाली. इतर मतदारांची संख्या वाढलेली नाही. तर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रभाग क्रमांक 42 मध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद करण्यात आली होती. मात्र, शनिवारी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीत त्यात 9 हजार 319 मतदारांची घट झाली असून मतदार संख्या 44 हजार 134 वरून थेट 34 हजार 815 इतकी नोंद करण्यात आली आहे. इतकी आहे. त्याखालोखाल प्रारूप मतदार यादीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये 39 हजार 863 इतकी होती. ती अंतिम मतदार यादीत 31 हजार 580 इतकी झाली आहे.