घरठाणेपंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या प्रवाशांना टीएमटीकडून विनामूल्य प्रवासाचं गिफ्ट

पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या प्रवाशांना टीएमटीकडून विनामूल्य प्रवासाचं गिफ्ट

Subscribe

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व जेष्ठ नागरिकांना एस.टी. महामंडळाच्या बसेसने विनामूल्य प्रवास करण्याची सुविधा घोषित केली आहे. जेष्ठ नागरिकांप्रती विद्यमान सरकारने आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ठाणे परिवहन समितीकडून एक महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळापाठोपाठ ठाणे महापालिका परिवहन समितीच्या बसेसमधून पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. याबाबत परिवहन समितीने मंगळवारी झालेल्या समितीच्या सभेत एकमताने निर्णय घेतला असून या प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे टीएमटीचा पास असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी दोन फोटो आणि आधार कार्डची प्रत जमा करावी असे आवाहनही समितीने केले आहे.

हे ही वाचा – हरवलेले आणि चोरीस गेलेले 70 मोबाईल फोन ठाणे पोलिसांनी केले हस्तगत

- Advertisement -

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व जेष्ठ नागरिकांना एस.टी. महामंडळाच्या बसेसने विनामूल्य प्रवास करण्याची सुविधा घोषित केली आहे. जेष्ठ नागरिकांप्रती विद्यमान सरकारने आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या औदार्यांचे हे उदाहरण समोर ठेवून ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सर्वसाधारण आणि वातानुकूलीत बसेसमधुन देखिल वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ठाण्यातील प्रवाशांना विनामूल्य प्रवास करण्याची सवलत दयावी, असा प्रस्ताव परिवहन समिती सदस्य बालाजी काकडे यांनी मंगळवारी 23 ऑगस्ट 2022 रोजीच्या परिवहन समितीच्या सभेमध्ये मांडला होता.

cm eknath shinde

- Advertisement -

हे ही वाचा – ठाण्यात गणेशोत्सवासाठी मोकळा ठेवलेला भूखंड भूमाफियाने लाटला, पालिकेकडून करआकारणी सुरूच

दरम्यन त्या ठरावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. पुढील पंधरा दिवसात वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्व प्रवाशांना ठाणे महापालिकेच्या बसेसमधून विनामूल्य प्रवास करण्याच्या सुविधेकरिता प्रशासनातर्फे पासेस देण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. असे परिवहन व्यवस्थापक बेहेरे यांनी सांगितले. हे पासेस मिळण्याकरिता जेष्ठ नागरिकांनी आपल्या आधार कार्डची प्रत व दोन फोटो दयावेत व या सुविधेचा लाभ घ्यावा असे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा – ठाण्यात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; पोलिसाचे पाकीट केले परत

 

Edited By – Nidhi Pednekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -