घरठाणेठाण्यात गणेशोत्सवासाठी मोकळा ठेवलेला भूखंड भूमाफियाने लाटला, पालिकेकडून करआकारणी सुरूच

ठाण्यात गणेशोत्सवासाठी मोकळा ठेवलेला भूखंड भूमाफियाने लाटला, पालिकेकडून करआकारणी सुरूच

Subscribe

या जागेवर साजरा होणारा गणेशोत्सव पाहता, या इमारतींच्या विकासकांनी ३० फूट बाय ७० फूट जागा केवळ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोकळी सोडली. त्यामध्ये स्व.नातू परांजपे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

ठाणे – एखाद्या भूखंडावरील मालमत्ता निष्कासित झाल्यानंतर सदर मालमत्तेवर आकारण्यात येणारा कर रद्दबातल करण्यात यावा, असा नियम आहे. मात्र, या नियमाला हरताळ फासून पाचपाखाडी-उदय नगरसमोर असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर ठाणे महापालिकेकडून कर आकारणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, येथील दोन विकासकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी हा भूखंड १९८० साली मोकळा सोडला होता. याच भूखंडावर भूमाफियाने हे अतिक्रमण केले आहे. (The plot left vacant for Ganeshotsav in Thane was encroached upon by the land mafia)

हेही वाचा -शुश्रुषागृह नियमांची अंमलबजावणी न करण्याऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, आयुक्तांकडे मागणी

- Advertisement -

पाचपाखाडी-उदय नगर येथील काही तरुणांनी १९७९ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. त्यांनी या मोकळ्या भूखंडावर गणेशोत्सव सुरू केला होता. १९८६ साली सदरचा मोकळ्या भूखंडावर स्वर्णा आणि सोमेश्वर या इमारतींची उभारणी करण्यात आली. मात्र, या जागेवर साजरा होणारा गणेशोत्सव पाहता, या इमारतींच्या विकासकांनी ३० फूट बाय ७० फूट जागा केवळ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोकळी सोडली. त्यामध्ये स्व.नातू परांजपे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

१९८७ साली काही भूमाफियांकडून दादागिरी करून ही जागा लाटण्यात आली. या भूखंडावर या भूमाफियांकडून चाळींचे बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आले. गणेशोत्सवासाठी राखीव असलेल्या भूखंडावर हे बेकायदा बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम केल्यानंतर भीड चेपलेल्या सदर भूमाफियाने अधिकच्या लाभासाठी सन 2008 मध्ये अनधिकृत इमारत बांधण्याचाही प्रयत्न केला. त्याविरोधात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. त्यानुसार आजतागायत सुमारे चारवेळा सदर ठिकाणी दिखाऊ कारवाई करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, भास्कर जाधव स्पष्टच बोलले

या कारवाईनंतर भूखंडावर बांधकाम असल्याच्या बोगस नोंदी कायम ठेवून मालमत्ता क्रमांक 1011328 अन्वये देवराम चिंदू गरूड या नावाने कर आकारणी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या भूखंडावर सन २०१८ मध्ये बेकायदेशीरपणे अवाढव्य असे सर्व्हिस स्टेशन उभारण्यात आले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या तक्रारींनतर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा नव्याने सर्व्हिस स्टेशन आणि टी सेंटर तथा स्नॅक्स सेंटर बेकायदेशीरपणे उभारले आहे. हे सर्व्हिस स्टेशन, स्नॅक्स सेंटर पाडून मोकळ्या भूखंडावर डांबरीकरण करून तो भूखंड गणेशोत्सवाव्यतिरिक्तच्या काळात पार्किंगसाठी देण्यात यावा, अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.

हेही वाचा – आनंद दिघेंबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक, दिला आठवणींना उजाळा

दरम्यान, एकीकडे रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करू नये, असे ठाणे महापालिकेकडून सांगितले जात असतानाच गणेशोत्सवासाठी राखीव असलेल्या भूखंडाचा भूमाफियांकडून ताबा घेतला जात असून ठामपाही अस्तित्वात नसलेल्या बांधकामावर कर आकारणी करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -