घरठाणेशुक्रवारपासून संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव

शुक्रवारपासून संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव

Subscribe

विनामूल्य प्रवेशिका गडकरी रंगायतन, घाणेकर नाट्यगृह येथे उपलब्ध

ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव शुक्रवार एक डिसेंबरपासून राम गणेश गडकरी रंगायतन येथे सुरू होत आहे. या महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका गडकरी रंगायतन आणि घाणेकर नाट्यगृह येथे उपलब्ध आहेत. या महोत्सवात, पं. राम मराठे स्मृती पुरस्काराने पं. सुरेश तळवलकर आणि निषाद बाक्रे यांचा गौरव करण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शुक्रवारपासून तीन दिवस हा महोत्सव होणार असून महोत्सवाचे हे 28वे वर्ष आहे. तसेच, पं. राम मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष यांचे हे जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्याच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवात शुक्रवार 1 डिसेंबर रोजी, पं. राम मराठे यांचे नातू युवा कलाकार भाग्येश मराठे यांचे गायन, पं. राम मराठे पुरस्कार वितरण सोहळा आणि ज्येष्ठ सतार वादक शुजात खान यांचे सतार वादन होईल. शनिवार 2 डिसेंबर रोजी ज्येष्ठ वादक पं. भीमण्णा जाधव यांचे सुंदरी वादन, नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांचे कथ्थक नृत्य आणि ज्येष्ठ गायिका शुभा मुद्गगल यांचे गायन होणार आहे.

तर, रविवार 3 डिसेंबर रोजी युवा कलाकार शाश्वथी चव्हाण यांचे गायन आणि मंजिरी वाठारे यांचे नृत्य, संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि ज्येष्ठ गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘जसरंगी’ या अनोख्या कार्यक्रमाने होईल. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -