घरठाणेजिल्हा वार्षिक योजनांचा निधी येत्या पंधरा दिवसात संपूर्ण खर्च होईल, याची दक्षता घ्यावी

जिल्हा वार्षिक योजनांचा निधी येत्या पंधरा दिवसात संपूर्ण खर्च होईल, याची दक्षता घ्यावी

Subscribe

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

जिल्हा नियोजन समितीमार्फत २०२२-२३ या वर्षासाठी वार्षिक योजनांअंतर्गत विकास कामांसाठी वितरित करण्यात आलेला निधी संपूर्ण खर्च होईल, याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. हा निधी खर्च करताना कामाचा दर्जा व गुणवत्ता राखली जाईल याचीही खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी गुरुवारी येथे दिले.जिल्ह्यातील विविध विभागांना विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाचा व कामाच्या सद्यःस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी निवेदिता पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीमार्फत  २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांसाठी दिलेल्या निधीच्या खर्चाचा यंत्रणा निहाय व योजनानिहाय आढावा शिनगारे यांनी घेतला. शिनगारे म्हणाले की, जिल्हा वार्षिक निधीतून करण्यात येणारी विकास कामे ही दर्जेदार असावीत. तसेच ही कामे वेळेत पूर्ण करून मार्चअखेरपर्यंत हा निधी पूर्णपणे खर्च होईल, याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे. विविध विभागांना प्रशासकीय मान्यतेच्या आधारे देण्यात आलेला निधी तातडीने खर्च करण्याची कार्यवाही करावी. अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी एकत्रित आराखडा तयार करावा. यावेळी यंत्रणांनी त्यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -