घरठाणेउप निरीक्षक ते उप अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना दरवर्षी धुलाई भत्ता द्या

उप निरीक्षक ते उप अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना दरवर्षी धुलाई भत्ता द्या

Subscribe

पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा राज्य सरकारकडे प्रस्ताव, पोलीस कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षक होण्यासाठी लवकरच एमपीएससीची परीक्षा जाहीर होणार

पोलीस उप निरीक्षक ते पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना दरवर्षी गणवेश धुलाई भत्ता मिळावा यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत माहिती दिली.
सध्या पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उप अधीक्षक (आयुक्तालय हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त) या अधिकाऱ्यांना तब्बल ६ वर्षांतून एकदा गणवेश धुलाई भत्ता मिळतो. या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना गणवेश धुलाईसाठी दरवर्षी भत्ता मिळतो. त्यामुळे केवळ पोलीस उप निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, निरीक्षक, वरिष्ठ निरीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या अधिकाऱ्यांना हा भत्ता दरवर्षी मिळत नव्हता.

पोलीस महासंचालकांनी याबाबत दखल घेत या अधिकाऱ्यांना दरवर्षी गणवेश धुलाई भत्ता मिळावा, अशी शिफारस करणारा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. प्रत्यक्ष फिल्डवर असलेल्या अधिकाऱ्यांना या धुलाई भत्त्याची इतर वरिष्ठ आणि अति वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा जास्त गरज असते. त्यामुळे आपण याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली. आयपीएस अधिकाऱ्यांना सध्या दरवर्षी २० हजार रुपये गणवेश धुलाई भत्ता मिळतो, अशी माहिती जाणकारांनी दिली. पोलीस कर्मचाऱ्यांना एमपीएससी द्वारे थेट पोलीस उप निरीक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा २०१४ पासून झालेली नाही. या परीक्षेबाबत आठवड्याभरात घोषणा होईल, अशी शक्यता असल्याची माहिती पांडे यांनी दिली. ही एमपीएससीची परीक्षा २०१४ पासून झालेली नाही.

- Advertisement -

पोलीस  कर्मचाऱ्यांना 12 कॅज्युअल लिव्ह
पोलिस कर्मचाऱ्यांना सध्या १२ कॅज्युअल लिव्ह मिळतात ते प्रमाण २० करण्याचा प्रस्ताव देखील सरकारकडे विचाराधीन असल्याची माहिती पांडे यांनी दिली. पोलिसांना सध्या महाराष्ट्र पोलीस कल्याण योजनेद्वारे काही ठराविक आजारांसाठी कॅशलेस योजना लागू आहे. ही योजना सर्व आजारांसाठी लागू करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -