घरठाणेसरकारमुळे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला दिरंगाई

सरकारमुळे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला दिरंगाई

Subscribe

पाच प्रकल्प स्थगित असल्याचा आमदार रईस शेख यांचा आरोप

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प या रखडलेल्या प्रकल्पास गती देणे, या प्रकल्पांमध्ये प्रकल्पबाधित नागरिकांना मोबदला मिळावा, तसेच दिल्ली मेट्रो कोर्पारेशन लिमिटेड यांनी सुचवण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली.  त्याचप्रमाणे या विषयी हिवाळी अधिवेशनात देखील प्रश्न विचारण्यात आला आहे.

भिवंडी शहर हे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे, कल्याण, मुंबई आणि नवी मुंबई या शहरासोबत जोडले जाणार आहे. या मार्गिकेची लांबी २४.९ किमी असून मेट्रो ५ ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गिकेवर १७ स्थानके प्रस्तावित आहेत.  त्यासाठी  ८ हजार ४१६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या मार्गिकेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २४ ऑक्टोबर २०१७ रोजी मान्यता दिली आहे.  त्यानुषंगाने  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने डिसेंबर २०१७ पर्यंत या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू होते. परंतु माजी आमदारांनी २८ नोव्हेंबर २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनात  ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे मार्गामध्ये कशेळी- पूर्णा – अंजूरफाटा – धामणकर नाका – कल्याण रोड (भिवंडी) गोपाळनगर-वंजारपट्टी नाका-चाविंद्रा पाईपलाईन मार्गे-टेमघर असा मेट्रो मार्गात बदल व्हावा अशी मागणी केली. त्यामळे या प्रकल्पात अडथळा निर्माण झाला.

- Advertisement -

दुस-या टप्प्यातील भिवंडी ते कल्याण मार्गाविषयी नगरविकास मंत्र्यांनी आणि एमएमआरडीएने २४ जानेवारी २०२० रोजीच्या बैठकीत मेट्रो पाचच्या मार्गामध्ये भिवंडी आणि कल्याण शहरातील वंजारपट्टी नाका, खडकपाडा, बिर्ला कॉलेज, शहाड तसेच  उल्हासनगर या क्षेत्रांचा समावेश करून प्राधिकरणामार्फत पुनर्विलोकन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या क्षेत्रांचा समावेश करण्यासाठी मेट्रो मार्ग पाचच्या मार्गामध्ये बदल करता येईल का, हे तपासून सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी मे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोशन लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नेमणूक मे २०२० मध्ये करण्यात आली होती. या सल्लागाराने माहे जानेवारी २०२१ मध्ये सुसाध्यता अहवाल सादर केला. या अहवालाप्रमाणए मेट्रो पाच प्रकल्पाच्या मूळ मार्गिकेत कोणताही बदल न करता वरील नमूद क्षेत्रामध्ये मेट्रोची सुविधा उपलब्ध करून द्यावयाची असल्यास मेट्रो एनईओ, मेट्रो लाईट आणि बस रॅपिड ट्रान्सिट या तीन प्रणालीचा वापर करण्याची शिफारस केली.

या अहवालास सक्षम प्राधिकरणामार्फत मंजुरी मिळाल्यानंतर पुढील योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र या प्रकल्पास चालना न मिळाल्याने शहराच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांच्या प्रवासाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे याविषयी प्रस्तावित मेट्रो पाच ठाणे-भिवंडी-कल्याण, प्रकल्पास गती देणे या बाबत आमदार रईस शेख यांनी राज्याच्या नगरविकास मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -