घरठाणेसंजय राऊत स्वतः आरोपी असताना उद्धव ठाकरेंच्या सोबत कसे- नरेश म्हस्के

संजय राऊत स्वतः आरोपी असताना उद्धव ठाकरेंच्या सोबत कसे- नरेश म्हस्के

Subscribe

ठाणे। संजय राऊत हे स्वतः आरोपी आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवले होते. त्यांनी स्वतःला पाहिलं आरशात पाहावे, नंतर त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करावी, असा हल्ला बोल शिवसेना प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला पुण्यातील लोक आले, त्यातील एकाने जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, गर्दीमध्ये आपण कुणाकडे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागत नाही. संजय राऊत ‘या’ क्षेत्रातील असतील किंवा तशी मंडळी त्यांच्या बरोबर असतील म्हणून ते प्रत्येकाला ओळखत असावेत, असा टोला म्हस्के यांनी लगावला. गर्दीमध्ये कोणी शुभेच्छा दिल्या? त्यावेळी त्या व्यक्तीला घेऊन येणारा पदाधिकारी युवा सेनेचा पदाधिकारी आहे. त्याचीही युवासेनेच्या पदावरून हकालपट्टी केली आहे. राऊत स्वतः आरोपी, गुन्हेगार आहेत, रोज उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उभे राहून मुलाखत देत असतात. स्वतःपण भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये आत गेलेले आहात, मग उद्धव ठाकरेंना विचारायचे का? भ्रष्टाचाराच्या आरोपी सोबत ते का बसतात, रोज बैठक का घेतात? असे नरेश म्हस्के म्हणाले.

उल्हासनगरातील गोळीबाराची घटना सर्वाना माहित आहे, संजय राऊत यांनी जे काही ट्विट केले आहे. ते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे लक्ष देत आहेत. परंतु आपण राऊतही आरोपी आहेत. जामिनावर सुटला आहात, त्यामुळे माझीही सर्वाना विनंती आहे, कि कुणी संजय राऊत यांच्या सोबत फोटो काढू नका. शिंदे शिवसेना गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपात संघर्ष नाही. व्यक्तिगत वाद आहेत. मात्र या स्तरावर वाद होऊ नयेत, असेही म्हस्के म्हणाले.

- Advertisement -

कोकणात उद्धव ठाकरेंची केवळ शंभर माणसांची सभा
ज्यावेळी बाहेर फिरायला हवे होते, त्यावेळी घरात बसले आणि आता फिरून काय उपयोग आहे, ज्या शिवसेनाप्रमुखांचा उद्धव ठाकरे वारसा सांगत आहेत त्या शिवसेना प्रमुखांनी लाखोंच्या सभा घेतल्या, प्रत्येक सभा ही पन्नास हजारांच्या वरतीच गर्दी झाली. आज शंभर, दोनशे माणसामध्ये भाषण करतात आणि शिवसेना प्रमुखांचे नाव घेतात, आपली परिस्थिती बघून वाईट वाटत आहे. परंतु ज्यावेळी बाहेर पडायला पाहिजे होते, त्यावेळी आपण बाहेर पडला नाहीत, आणि मग नितेश राणेंसारखी माणसे आपल्याला आव्हान देतात, नितेश राणे यांनी सांगितले मैदान आम्ही देतो माणसेही आम्ही देतो, पण मोठी सभा घ्या, इतकी दुर्दैवी वेळ तुमच्यावर आलेली आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला.

महेश गायकवाड अतिदक्षता विभागात
महेश गायकवाड यांची प्रकृती सुधारत आहे. पण आताही ते अतिदक्षता विभागात दाखल आहेत. सहा गोळ्या त्यांच्या शरीरात गेलेल्या आहेत. सुधारणा होतेय, ही चांगली गोष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -