घरठाणेमहेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा

महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा

Subscribe
कल्याण। कल्याण पूर्व शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सोमवारी सकाळी कार्यकर्ते, त्यांच्या समर्थकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिली. महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून काही धर्मस्थळांमध्ये प्रार्थना केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून शहर प्रमुख महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून दिली जात होती.  सोमवारी सकाळी खासदार  डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महेश यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. या भेटीत महेश गायकवाड  बोलत असल्याचे दिसत आहे.
हिललाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून एकत्र जमले असताना मुलाला मारहाण झाल्याने संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी गोळीबार केला होता. यात दोघेही जबर जखमी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. या आरोपी आणि जखमी यांच्या समर्थकांंमध्ये बहुतांश गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा समावेश आहे. मात्र केवळ राजकीय वरदहस्तामुळे त्यांना कायद्याची भीती नसल्याचे चित्र आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -