घरठाणेठाण्यात पहिल्या दोन लाटेत ३४ हजारांहून अधिक बालके कोरोनाग्रस्त; २० जणांचा मृत्यू

ठाण्यात पहिल्या दोन लाटेत ३४ हजारांहून अधिक बालके कोरोनाग्रस्त; २० जणांचा मृत्यू

Subscribe

७ हजार ५६८ रुग्ण हे सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णात उपचार घेत आहेत.

कोरोना या आजाराची लक्षणे ही वयोवृद्ध किंवा मध्यम आणि तरुण या वयोगटातच दिसून आली नाहीतर ती लक्षणे ही ०-१५ या वयोगटातही (लहान मुलांमध्ये) प्रामुख्याने समोर आली आहेत. जिल्ह्यात ०-१५ या वयोगटातील आतापर्यंत ३४ हजार ७८० बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आजाराने जिल्ह्यात २० बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून त्यामध्ये या लाटेत ४ ते १४ या वयोगटाला संभव धोका वर्तविण्यात आला आहे. त्यादृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यात मार्च २०२० पासून ते आतापर्यंत ५ लाख १८ हजार ४९० जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यातच, ५ लाख ६ हजार ६१३ जणांनी या आजारावर मात करून घरी परतले आहेत. मात्र ९ हजार ४०९ जणांचा या आजाराने मृत्यू झाला.

७ हजार ५६८ रुग्ण हे सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णात उपचार घेत आहेत. फेब्रुवारी अखेरीस असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या प्रचंड वाढली होती.यावेळी बेड्स मिळविण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली होती. लॉकडाऊनमुळे वाढलेल्या रुग्ण संख्येला आळा घालण्यात यश आले. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्ण संख्या ५०० ते ७०० च्या घरात आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवली जात असल्याने ठाणे महानगरपालिकेने लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी पार्कीग प्लाझा कोवीड सेंटर येथे एक कक्ष उभारला आहे.

- Advertisement -

 

याठिकाणी १०० बेडची व्यवस्था करण्यात आला असून त्यामध्ये ५० ऑक्सीजनचे, २५ आयसीयु आणि २५ आयसीयु व्हॅन्टीलेटरचे बेडचा समावेश आहे. त्यातच, जिल्ह्यात ० ते १५ या वयोगटात कोरोना झालेल्या बालकांच्या आकडेवारीत एकूण ३४ हजार ७८० बालकांना त्याची लागण झाली तर २० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१  या वर्षभरात १८ हजार ८९९ बालकांची कोरोनाग्रस्त म्हणून नोंद झाली आहे. त्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मार्च ते मे २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास १५ हजार ८८१ बालक कोरोना ग्रस्त झाले होते. हा आकडा जरी मोठा असला तरी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

” जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना ग्रस्त लहान मुलांची नोंद झाली आहे. त्यातच २० जणांचा मृत्यूही झालेला आहे. पण, मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्ये लक्षणे अद्यापही दिसून आलेली नाहीतर, मात्र तिसऱ्या लाटेत संभव धोका हा लहान मुलांना असल्याने त्यादृष्टीने बेड्स, ऑक्सिजन, औषध आणि इतर साहित्य घेतले आहे. लहान मुलांमध्ये निश्चित लक्षणे नाहीत. ती दिसून आल्यावर त्याच्यावर गाईडलाईन प्रमाणे योग्य उपचार केली जातील.  ”
– डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -