घरठाणेके-३१ तंत्रज्ञानाच्या पहिल्या रस्त्याचे कपिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

के-३१ तंत्रज्ञानाच्या पहिल्या रस्त्याचे कपिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

मैदे वळणाचा पाडा-बिज पाडा रस्त्याचे काम पूर्ण

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातून प्रथमच के-३१ तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या देशातील पहिल्या रस्त्याचे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी नेहमीपेक्षा ३० टक्के कमी खर्च येतो. भिवंडीतील मैदे येथे तयार केलेला हा रस्ता पावसाळ्यात टिकल्यास अशाच पद्धतीने देशभर रस्ते तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
 मोदी@९ कार्यक्रमांतर्गत अंतर्गत विकास तीर्थ उपक्रमात या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातून देशात प्रथमच के-३१ तंत्रज्ञानाचा रस्त्यासाठी वापर केला जाणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नव्या तंत्रज्ञानानुसार होणाऱ्या या रस्त्याच्या पायलट प्रोजेक्टसाठी भिवंडी तालुक्यातील मैदे वळणाचा पाडा-बिज पाडा रस्त्याची निवड केली होती. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आज त्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर रस्त्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मैदे गावाच्या परिसरातील वाड्यांचे सध्या अस्तित्वातील आठ माही रस्ते बार माही करावेत. तसेच या वाड्यांमधील अंतर्गत रस्तेही कॉंक्रीटचे करण्याचे आश्वासनही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, शांताराम पाटील, कैलास जाधव, दयानंद पाटील, सचिन पाटील, दशरथ पाटील, श्रीकांत गायकर, शरद बुबेरा, सरपंच संजना घाटेकर आदींची उपस्थिती होती.के-३१ तंत्रज्ञान हे पर्यावरणपूरक, पारंपरिक रस्ते बांधणी प्रक्रियेपेक्षा रास्त व अधिक प्रभावी तंत्रज्ञान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -