घरठाणेलघुपट निर्मिती स्पर्धेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन

लघुपट निर्मिती स्पर्धेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन

Subscribe

जल जीवन मिशनची जाणीव जागृती

ठाणे । जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार आणि प्रसिध्दीकरिता जिल्हा स्तरावरुन विविध जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी राज्य पाणी, स्वच्छता मिशन कक्षाच्या मार्गदर्शनात जिल्हा स्तरावर लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे. या लघुपट स्पर्धेचे विषय पाण्याचे शाश्वत स्त्रोत, जल संवर्धन, जल जीवन मिशन यशोगाथा, पाणी पुरवठा व देखभाल दुरुस्ती, हर घर जल घोषित गाव विकास, विविध योजनांचे कृतीसंगम, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती असे असून लघुपट स्पर्धेचे बक्षीस व पारितोषिक स्वरूप प्रथम रुपये 31 हजार व पारितोषिक, द्वितीय रु.21 हजार व पारितोषिक, तृतीय- रुपये 11 हजार व पारितोषिक याप्रमाणे राहील, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुलकर्णी जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी दिली आहे.

या स्पर्धेविषयीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- जल जीवन मिशन विषयक विविध बाबींना अनुसरुन लघुपट निर्मिती स्पर्धा जिल्हा स्पर्धकांनी लघुपटाची निर्मिती ही स्वत: केलेली असावी. पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्व संगीत, गीत, चित्रीकरण हे स्वत: तयार केलेले असावे. अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभाग यांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट या स्पर्धेसाठी सादर करण्यात येवू नयेत. या स्पर्धेसाठी तयार करण्यात येणार्‍या लघुपटाबाबतचे कॉपीराईटचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाने सादर करणे आवश्यक आहे. लघुपट निर्मितीसाठी वापरण्यात आलेले शुटिंग साहित्य व्यावसायिक व उत्तम दर्जाचे असावे. लघुपट निर्मितीसाठीच्या भाषेचा वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणारा नसावा. लघुपट स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेले लघुपट पात्र ठरविण्याचे व निवडीचे अधिकार जिल्हास्तरीय निवड समितीचे असतील. लघुपट स्पर्धकांनी आपले लघुपट जिल्हास्तरावर 29 फेब्रुवारी 2024 पूर्वी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, ठाणे येथे पेन ड्राईव्हमध्ये प्रत्यक्ष आणून अथवा [email protected] या मेलवर सादर करावेत. लघपुटासोबत स्पर्धकाने आपली संक्षिप्त माहिती तसेच लघुपटाची संहिता तीन प्रतीत सादर करावी, असे जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी कळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -