घरठाणेसफाई कामगारांसाठी नमस्ते उपक्रम

सफाई कामगारांसाठी नमस्ते उपक्रम

Subscribe

उल्हासनगर। उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि उपायुक्त डॉ.सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पाणीपुरवठा विभाग प्रमुख परमेश्वर बुडगे यांच्या उपस्थितीत उल्हासनगर महापालिकेच्या मिड टाऊन हॉल मध्ये सकाळी 11 वाजता नॅशनल अ‍ॅक्सन फॉर मॅकेनाईज सॅनिटेशन ईको सिस्टम या (नमस्ते) उपक्रमांतर्गत एस एस डब्ल्यू म्हणजेच मैला व्यवस्थापन, भुयारी गटार स्वच्छता करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी प्रोफाईल कँपचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला सफाई कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी या कार्यक्रमात सर्व उपस्थित सफाई कर्मचारी यांना त्यांचा राहणीमानाचा दर्जा वाढविणे, विविध विमा योजना, आरोग्य योजना बद्दल माहिती दिली. तसेच सफाई करण्यासाठी सरकार तर्फे देण्यात येणार्‍या सबसिडीबाबतची माहिती एएलएलएसजी प्रोजेक्ट ऑफिसर राधा कुसट यांनी दिली. सर्व उपस्थित सफाई कर्मचारी यांना स्वयं सुरक्षिततेची काळजी घेवून सफाईचे काम कसे करावे? स्वयं संरक्षणात्मक साहित्याचा वापर का करावा? सफाईसाठी वापरण्यात येणार्‍या विविध संसाधनांचा योग्य वापर करण्याविषयी आणि सफाईचे साधने, वाहने खरेदी करताना शासना तर्फे सफाई कर्मचारी यांना देण्यात येणार्‍या सबसिडी बाबत तसेच त्यांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्जपुरवठा उपलब्ध आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तर बचत गट कसे तयार करायचे त्याबाबतचे मार्गदर्शन एन एलएम विभागामार्फत करण्यात आले.या नमस्ते उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचा कर्मचार्‍यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -