घरठाणेठाण्यातून गायब झालेली मुलगी सापडली दिल्लीत

ठाण्यातून गायब झालेली मुलगी सापडली दिल्लीत

Subscribe

आश्रय दिलेल्या मुलीनेच केले अपहरण

 दिल्लीवरून आलेल्या एका २० वर्षीय ज्योती नामक तरुणीला ठाणे फुलविक्रेत्यांनी राहत्या घरी आश्रय दिला होता. त्याच तरुणीने त्या फुलविक्रेत्याच्या मुलीचे अपहरण केल्याची बाब समोर आली आहे. त्या मुलीने दाखवलेल्या तत्परतेने तिची सुटका नौपाडा पोलिसांनी केली आहे. तिचे अपहरण हे विक्रीसाठी झालेले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून अपहरण कर्त्या ज्योती या तरुणीचा शोध सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
कळवा भास्करनगर येथे राहणारी १३ वर्षीय मुलगी २९ डिसेंबर रोजी बेपत्ता झाली होती. तसेच तिच्या आई- वडिलांचा ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फुलविक्र ीचा व्यवसाय असल्याने सध्या शाळा बंद असल्याने ती तिच्या आई-वडिलांना फुलविक्र ीच्या व्यवसायामध्ये मदत करत होती. अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या आई वडीलांनी शोध घेतला. मात्र, ती मिळून  नसल्याने अखेर त्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात जाऊन केली. मात्र हा प्रकार नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
 त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने  याप्रकरणाचा तपास सुरू केला. पथकाने  मुलीच्या आई- वडिलांची चौकशी केली असता, त्यांच्या घरी दोन ते तीन दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेली ज्योती या तरुणीला आश्रय दिला होता. त्या दोघी एकाच दिवशी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याचदरम्यान नौपाडा पोलिसांचे एक पथक त्यांच्या मूळ गावी रवाना झाले होते. तसेच ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली.
याचदरम्यान १ जानेवारीला त्या बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडिलांच्या मोबाईल क्रमांकावर दिल्लीतील एका व्यक्तीच्या मोबाईलवरून फोन आला. त्या व्यक्तीने तुमची मुलगी दिल्ली येथील द्वारका भागात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तो व्यक्ती तिला तात्काळ दिल्ली येथील द्वारका पोलीस ठाण्यात घेऊन गेला आहे. अशी माहिती मुलीच्या वडिलांनीही नौपाडा पोलिसांना दिली.

  मुलीच्या आई-वडिलांची ओळख पटविण्यासाठी द्वारका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नौपाडा पोलिसांना व्हिडीओ कॉल केला. मुलीने हेच आपले आई-वडिल असल्याचे सांगितल्यानंतर द्वारका पोलिसांनी तिचा ताबा घेतला.  तात्काळ संजय धुमाळ यांनी तीन अधिकाऱ्यांना विमानाने तिला ठाण्याहून दिल्लीला पाठविले. पोलिसांनी तीन तासात मुलीचा ताबा घेतल्यानंतर  मंगळवारी त्या मुलीला विमानाने पुन्हा ठाण्यात आणून तिच्या पालकाकडे सुपूर्द केले. तसेच तिचे अपहरण करणाऱ्या त्या तरुणीचा शोध नौपाडा पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -