घरठाणेशिवजयंती मिरवणुकीत तलवारी नाचविल्या

शिवजयंती मिरवणुकीत तलवारी नाचविल्या

Subscribe

पोलिसांकडून तपास सुरू

शिवजयंती उत्सवात अनेक मंडळांनी सहभाग नोंदवून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली असतानाच नाचण्यात तल्लीन झालेल्या युवकांनी हातात म्यानातून तलवारी काढत नाचविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. ही घटना कल्याण जवळील मोहने या ठिकाणी घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोहने येथे विविध मंडळाच्या माध्यमातून शिवजयंतीचे विविध कार्यक्रम दोन दिवसापूर्वी यशस्वीरित्या संपन्न पार पडले होते. शनिवारी सायंकाळी उशिरा मोठ्या जल्लोषात शिवप्रेमींनी मिरवणूक पार पाडीत असतानाच दोन युवकांनी या मिरवणुकीत म्यान असलेल्या तलवारी बाहेर काढीत त्यांना मिरवणुकीत खुलेआम नचविल्या. या बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने खडकपाडा पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली असून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -