घरठाणेठाण्यातील 57 हजारांहून अधिक चाकरमानी लालपरीतून कोकणाकडे रवाना

ठाण्यातील 57 हजारांहून अधिक चाकरमानी लालपरीतून कोकणाकडे रवाना

Subscribe

दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी विभाग सज्ज होते. कोकणवासीयांना नेण्यासाठी राज्यातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे यांच्यासह आठ डेपोंची साथ लाभल्याने एकूण 1 हजार 380 गाड्या आतापर्यंत हाऊसफुल होऊन ठाण्यातून रवाना झाल्या.

ठाणे: यावर्षी गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे. यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ठाणे विभागातून तब्बल एक हजार 380 बसेस कोकणात रवाना झाल्या आहेत. तर, नोकरी धंद्याच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, बोरिवली- भाईंदर तसेच विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेले 57 हजारांहून अधिक चाकरमानी एसटीच्या या लालपरीतून विघ्नहर्ताच्या आगमनासाठी कोकणात खड्ड्यांचे विघ्न पार करत सुखरूप दाखल झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 535 जादा बसेस तर नियोजनापेक्षा 379 जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रुप बुकिंग 962 बसेसचा समावेश असून 28 आणि 29 ऑगस्ट रोजी 1 हजार 222 बसेस कोकणात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे ही वाचा –  ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रा; परिवहन मंडळ आणि महापालिकेकडून विशेष सुविधा

- Advertisement -

गणेशोत्सव म्हटले तर कोकणी माणूस कोकणात गेल्याशिवाय राहत नाही असे म्हटले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी विभाग सज्ज होते. कोकणवासीयांना नेण्यासाठी राज्यातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे यांच्यासह आठ डेपोंची साथ लाभल्याने एकूण 1 हजार 380 गाड्या आतापर्यंत हाऊसफुल होऊन ठाण्यातून रवाना झाल्या. त्यातून कोकणवासीय सुरक्षित आणि आरामदायी प्रवास एसटीच्या लालपरीतून करत कोकणात दाखलही झाले आहेत. ठाणे विभागातून एकूण मार्गक्रमण झालेल्या बसेस पैकी 53 शिवशाही, 10 सेमी लक्झरी आणि उर्वरित 1 हजार 317 साध्या बसेसचा समावेश आहे. 26 ऑगस्टला जरी गणेशोत्सवासाठी कोकणात बसेस सोडण्यात आल्या तरी 28 आणि 29 ऑगस्ट रोजी आरक्षण आणि ग्रुप द्वारे बुकिंग झालेल्या 1 हजार 222 बसेस सोडण्यात आल्या. तसेच गौराई साठी कोकणात जाण्यासाठी एसटी बसची मागणी झाल्यास बसेस सोडण्यात येतील, असेही ठाणे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.

 एकूण चाकरमानी
कोकणात जाण्यासाठी तिकीट आरक्षण आणि ग्रुपद्वारे आरक्षण अशी व्यवस्था केली होती. तिकीट आरक्षणात एका बसमधून 40 प्रवासी बुकिंग केली जाते. तर ग्रुप आरक्षणात 42 प्रवासींची बुकिंग केली जाते. त्यानुसार 418 आरक्षित बसमधून 16 हजार 720 तर 962 बस ग्रुप आरक्षणाद्वारे 40 हजार 404 असे 57 हजार 124 चाकरमानी सुखरूप गावी दाखल झाले आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – ठाण्यातील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी साक्षात विघ्नहर्त्याचेच आवाहन!

या आगारातून सुटल्या एवढ्या गाड्या
ठाणे जिल्ह्यातून सुटलेल्या एकूण 1 हजार 380 बस गड्यांमध्ये ठाणे खोपट आगार येथून 885 गाड्या सोडण्यात आल्या. त्या पाठोपाठ कल्याण 360, बोरिवली 297 आणि विठ्ठल वाडी येथून 138 एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत.

यंदा गणेशोत्सवावर राजकीय छाप
आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेत, राजकीय पक्षांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकणी माणसाच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसेना (दोन्ही गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचा समावेश आहे. सर्वाधिक 400 हुन अधिक बसेस शिवसेनेच्या शिंदे गटाकडून बुक करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे राजकीय पक्षांची छाप पाहण्यास मिळून आली.

हे ही वाचा – ठामपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; अखेर सातवा वेतन आयोग लागू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -