नाडर गँगची आठ वर्षांनी निर्दोष मुक्तता

कल्याण सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, पोलीस तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

आधारवाडी मध्यवर्ती कारागृहाची वीस फूट उंच भिंत ओलांडून पळून जाणारा तसेच पोलीस स्टेशनमध्ये घुसून गाडी चोरी करून पसार होणारा आणि जीवघेण्या हत्येचा गंभीर गुन्ह्यातून तब्बल आठ वर्षांनी कल्याण डोंबिवलीतील नाडर गॅंगला कल्याण न्यायालयात पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. कल्याण न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी या गॅंगचा गुन्ह्यांची त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे निष्कर्ष नोंदवित मानपाडा पोलीस स्टेशनच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत निर्दोष मुक्तता केली आहे.

मानपाडा रोडवरील पिंपळेश्वर शनि मंदिरा नजीक एका बंगल्यामध्ये २५ जून २०१५ रोजी चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या नाडर गॅंगला एका टोळक्याने हटकले होते. हटकणाऱ्या टोळक्याच्या सदस्याला दक्षिणात्य चित्रपटात दाखविणाऱ्या हाणामारीच्या सीन प्रमाणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मित्रांचा वाढदिवस साजरा करून सीएनजी भरून येणारे तीन रिक्षा चालक मित्र सोन्याची चैन चोरीला गेल्याने आपल्या मित्राची स्कार्पिओ घेऊन नाडर गॅंगला पकडण्यासाठी घटनास्थळी केले होते. नाडर गॅंग ने या रिक्षाचालकामधील सर्वात पुढे आलेला चा गळा चिरून पाठलाग करीत त्याच्या डोक्यात कोयता मारला होता. स्कार्पिओ गाडी त्यांच्या अंगावर नेत गाडीची नाचत करीत जीवे ठार मारण्याचा तसेच मनाई आदेश व शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
नाडर गॅंग ने मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घातलेल्या हैदोसामुळे मानपाडा पोलिसांना विशेष पथके निर्माण करावी लागली होती या अनुषंगाने ठीक ठिकाणी या गॅंगचा पोलीस शोध घेत होते. कोबींग ऑपरेशन मध्ये देखील नाडर गॅंग पोलिसांना सापडून येत नव्हती. पोलिसांना आव्हान देणाऱ्या नाडर गॅंगला अटक करण्यास पोलिसांना मात्र यश मिळत नव्हते.

पोलीस नाडर गॅंग च्या मागावर असताना अल्टो गाडीमध्ये नाडर असल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला मात्र आपण पकडले जाऊ यामुळे नादर याने अल्टो गाडीतून उतरून ते फरार झाले होते. दरम्यान पोलिसांनी अल्टो गाडी जप्त करीत पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवली होती. कालांतराने अल्टो गाडी पोलीस स्टेशनच्या आवारातून नादर याने घेऊन जात आत मध्ये उभे असणाऱ्या पोलीस वाहनांची टायरमधील हवा देखील काढली होती. पोलिसांनी नादर गॅंगचा म्होरक्या मनी कंदन नाडर याला नंतर अटक केली होती. 2015 मध्ये आधारवाडी मध्यवर्ती कारागृहात तो बंदीवान असताना कारागृहातील वीस फूट उंच भिंत ओलांडून तो फरार देखील झाला होता.

दहा साक्षीदार नोंदविला गेलेल्या या खटल्याचे प्रमाणपत्र कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नव्हते स्कार्पिओ वाहन अंगावर नेण्यात आले होते त्या वाहनाच्या अस्तित्वाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नाडर गॅंग मधील आरोपींना अटक करणारे व गुन्ह्याचा तपास करीत असणारे पोलीसच आरोपींना न्यायालयात ओळखू शकले नाहीत. मनी कंडन नाडर या आरोपीला कोठून अटक केली याचा उलगडा न्यायालयात झाला नाही. तामिळनाडू मध्ये ज्या एसटी स्टँडवरून इतर दोघांना अटक करण्यात आली ते स्टॅन्ड अस्तित्वातच नव्हते, हे बचावाच्या पुराव्यात स्पष्ट झाले. शिवाय त्यांच्यावर रात्रीच्या वेळेस रिक्षाचे टायर चोरीचा गुन्हा होता, जखमी चे कपडे, हत्यारे, घटनास्थळी कोठेही रक्ताचा डाग नव्हता. ज्याची चैन चोरीला गेली असे कथन होते, त्याबाबतचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

मानपाड्यातील शनी मंदिरा नजीक असलेल्या बंगल्याजवळ घटना घडली असताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्याचे सांगूनही पोलिसांनी ते फुटेज प्राप्त केले नव्हते. आरोपींची उपस्थिती, गुन्ह्याचा उद्देश या कशा बाबतही पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांना पुरावा देता आला नसल्याचे तसेच कल्याण न्यायालयातील अधिवक्ता गणेश घोलप यांच्या कौशल्याने न्यायालयात अंतिम सुनावणी संपन्न झाली. कल्याण न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी नाडर गँगचा गुन्ह्यांशी कोणताही संबंध नसल्याचे निष्कर्ष नोंदवित मानपाडा पोलीस स्टेशनच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत तब्बल आठ वर्षांनी नाडर गँगची आठ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली आहे.