घरठाणेठाण्यात सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून तरुणी जखमी

ठाण्यात सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून तरुणी जखमी

Subscribe

ठाणे : घोडबंदर रोड, मानपाडा येथील देवतिर्थ सोसायटीच्या ‘बी’ विंग या इमारतीच्या तळ मजल्यावर रूम क्रमांक- बी/००३ या सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडल्याची घटना रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तन्वी दत्ता चव्हाण ही १८ वर्षीय तरुणी जखमी झाली असून तिच्या डोक्याला व डाव्या पायाला किरकोळ दुखापत झालेली आहे.

घोडबंदर रोड,मानपाडा येथील अंदाजे २३ वर्षे जुने बांधकाम असलेल्या देवतिर्थ सोसायटीच्या ‘बी’ विंग या इमारतीच्या तळ मजल्यावरील सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून एक जण जखमी झाल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, उप-अभियंता व कनिष्ठ अभियंता (वर्तकनगर प्रभाग समिती- सार्वजनिक बांधकाम विभाग), वर्तकनगर प्रभाग समिती- अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी धाव घेतली.

- Advertisement -

यावेळी वर्तकनगर प्रभाग समिती बांधकाम विभागाचे उप-अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली त्या रूममधील धोकादायक असलेले स्लॅबचे प्लास्टर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने काढून घेण्यात आले आहे. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती उप-अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची इमारत धोकादायकच्या C2/A या वर्गवारीत घोषित केले असल्याचे सांगण्यात आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.


मोदींचे नाणे…. उद्धव ठाकरेंची टीका तर, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -