घरठाणेठाण्याला होणार बाहेरील शहरातून ऑक्सिजनचा पुरवठा

ठाण्याला होणार बाहेरील शहरातून ऑक्सिजनचा पुरवठा

Subscribe

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने भेट

शहरात ऑक्सिजन तुटवड्याचा फटका फक्त आता खासगी रुग्णालयांनाही बसू लागला आहे. त्यातच, हा तुटवडा भरून काढण्यासाठी आता बाहेरच्या शहरांमधून ठाण्याला ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. तसेच जेएसडब्ल्यु प्लँटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना वितरकांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात निर्देश ठाणे जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ही माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीदरम्यान पुढे आली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील बिगर खासगी करोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.संतोष कदम यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली. एखाद्या रुग्णामध्ये करोनाची लक्षणे दिसून येत असली तरी त्याच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक येत नाही, तोपर्यंत त्या रुग्णाला करोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही.

 

- Advertisement -

परंतु चाचणी अहवाल येईपर्यंत रुग्णाला उपचार मिळाले नाहीतर त्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे अशा रुग्णांवर बिगर करोना रुग्णालयांतील स्वतंत्र कक्षामध्ये उपचार केले जात आहेत. शहरातील बिगर खासगी करोना रुग्णालयांमध्ये सुमारे ८० टक्के करोना संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता लागत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्येही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे, असे असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सांगितले. ज्या रुग्णालयाकडे अतिरिक्त साठा असेल त्यांच्याकडून तो घेणे किंवा जिथे पुरेसा ऑक्सिजन साठा आहे, तिथे रुग्णांना हलविणे, असे प्रकार गेल्या आठ दिवसांपासून सुरु आहेत. पण, आता सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन तुटवडा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रुग्णांना दुसऱ्या एका ठिकाणी हलविणे मोठ्या जिकरीचे होऊन बसले आहे.

 

- Advertisement -

त्यातच ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यु होऊ शकतो. तसेच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा कमी पडू लागला आहे, असेही असोसिएशनने निदर्शनास आणून दिले. त्यावेळी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी बाहेरील शहरातून ऑक्सिजन पुरवठा लवकर होईल, असे आश्वासन देताना, जेएसडब्ल्यु प्लँटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना वितरकांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -