घरठाणेसुसाई़ड नोट लिहून घेऊन हत्या करायची ही परमबीर सिंग यांची स्टाईल; नाशिकचे...

सुसाई़ड नोट लिहून घेऊन हत्या करायची ही परमबीर सिंग यांची स्टाईल; नाशिकचे उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांचा आरोप

Subscribe

२०१७ साली सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात मला खोट्यापणाने गुंतवून पूर्ववैमानस्यातून मला अडकवण्यात आल्याचा आरोप निपुंगे यांनी केला आहे.

ठाण्याचे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटसही काढण्यात आली आहे. अशातच आता २०१७ साली सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे आणि याच प्रकरणात मला खोट्या पणाने गुंतवून पूर्ववैमानस्यातून मला अडकवण्यात आले आहे आसा आरोप ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि नाशिकचे पोलिस उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केली आहे.

परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र त्यांना अटक का होत नाही? असा सवाल विचारत निपुंगे यांनी विचारला आहे. परमबीर सिंग यांना ज्याची हत्या करायची असते त्याआधी ते पीडिताकडून सुसाईड नोट लिहून घेतात असा आरोप नाशिकचे उपअधीक्षक शाम कुमार निपुंगे यांनी केला आहे. माझा काटा काढण्यासाठी परमबीर सिंग यांनी महिला पोलीस कर्मचारी सुभद्रा पवार यांची हत्या करून आत्महत्या दाखवल्याचा प्रकार असल्याचे निपुंगे यांनी सांगितले आहे. एकदा पोलीस शिपाई हवालदार आणि पीएसआय असेल तर त्याला गुन्हा दाखल झाल्यावर लागलीच अटक होते. मात्र हेच एखाद्या बड्या अधिकाऱ्यासोबत का होत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisement -

 

हे ही वाचा- ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

- Advertisement -

२०१७ साली सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात मला खोट्यापणाने गुंतवून पूर्ववैमानस्यातून मला अडकवण्यात आले आहे निपुंगे यांनी सांगितले आहे. ठाणे न्यायालयात या संदर्भात खटला सुरू आहे. न्यायालयात निपुंगे यांनी सुभद्रा पवार यांच्या शवविच्छदनाच्या वेळी त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. मात्र न्यायालयात ठाणे पोलिसांनी आता हे रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे परमबीर सिंग हे पुरावे नष्ट करण्याचे काम करतात असा ही आरोप यावेळी निपुंगे यांनी केला आहे.

 

भाजप सत्तेत असतानाही आणि आता महाविकास आघाडी सरकार मध्येही परमबीर प्राईम पोस्टिंग वर होते. असा खुलासा करत निपुंगे यांनी परमबीर जेथे पोस्टिंग ला होते तिथे त्यांना राजकीय मदत होत असल्याचे सांगितले. या सोबत परमबीर हे पोस्टिंग ला असलेल्या ठिकाणी कार्यरत असलेले इतर अधिकारी देखील त्यांना मदत करतात असा आरोप देखील निपुंगे यांनी केला आहे .परमबीर सिंग यांना आतापर्यंत अटक न करण्याचे कारण काय? उशिराने लूक आऊट नोटीस का काढली? असे सवाल निपुंगे यांनी विचारले असून कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही हे दाखवून देण्यासाठी त्यांच्यावर अटकेची कारवाई करून कायदा हा सर्वात मोठा असल्याचे दाखवून देण्याचे आवाहन निपुंगे यांनी सरकार आणि न्याय व्यवस्थेला केले आहे.

हे ही वाचा- राष्ट्रवादीमुळेच महापौरपद बिनविरोध, म्हस्केंनी विसरू नये – राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -