घरठाणेठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Subscribe

स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे बघायचे वाकून असा टोला प्रवीण दरेकरांनी सरकार ला लगावला.

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि  कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन आज सकाळपासून सुरु केले आहे . कामावरून काढून टाकण्याच्या अचानक नोटीस मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. सुमारे ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाला भेट दिली व त्यांच्या मागण्या समजून घेतल्या त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. येत्या दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर भाजप रुग्णालयात बंद पडेल व तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे.

कोविड योध्याना आपण देवदूत म्हणतो आणि असे कामावरून कमी करणे योग्य नाही. ओम साई एजन्सी ही घोटाळे बाज असून त्यांच्यावर देखील सीबीआय चौकशी लावा अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्ष असला तरी आम्ही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना हात जोडून नम्र विनंती करतो की हवं तर श्रेय तुम्ही घ्या मात्र यांना कामावर घ्या. ज्यांच्यामुळे हे हॉस्पिटल चालू आहे त्यांनाच कामावरून काढले योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेबद्दल बोलताना म्हणाले की, कार्यक्रम असेल तर गुन्हा दाखल करायचे ,यात्रा असफल कशी होईल या साठी राज्य सरकार गुन्हा दाखल करत आहे. मोदीना आशीर्वाद देण्यासाठी लोक येत आहे आम्ही बोलावत नाही. या सारकारचे  कार्यक्रम होतात त्यात गर्दी करायची आणि आमच्या वर बोट दाखवायचे. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे बघायचे वाकून असा टोला देखील त्यांनी सरकार ला लगावला.

- Advertisement -

हे ही वाचा- बोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर; हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल

पुण्याला राष्ट्रवादी च्या कार्यक्रम मध्ये ७ ते ८ हजार लोकांची गर्दी होती. त्याच बरोबर जालना ,नाशिक ,बीड या ठिकाणी मेळावा घेण्यात आला होता त्याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सरकारी पक्षाच्या लोकांनी गर्दीचे कार्यक्रम करायचे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आला कि तुम्हाला नियम दिसतात. सरकारने मंदिरे उघडावेत त्यावर अनेकांची रोजगार अवलंबून आहेत सर्व नियमावली जाहीर करून सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

 

मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या चालतात म्हणजेच मंत्रालय चे मदिरा करायला निघाले आहेत आणि मंदिरे चालू करत नाही सरकार काय निर्णय घेते हे काय कळायला मार्ग नाही. तसेच नाना पाटोले  यांनी अगोदर स्वतःची उंची वाढवावी केवळ आपली उंची असून चालत नाही तर वैचारिक उंची हवी. मोदींवर टीका करणे इतपत त्यांनी आपली कर्तृत्व आणि क्षमता निर्माण केलेली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या क्षमते नुसार आणि आपल्या औकतीनुसार बोलावे असे खडेबोल सुनावले. त्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

हे ही वाचा- कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला दणका, ठाण्यात नगरसेवकांवर गुन्हा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -