घरठाणेदोन लाख द्या, नाहीतर नोटीस पाठवतो; खंडणीखोर दुकली ठाण्यात जेरबंद

दोन लाख द्या, नाहीतर नोटीस पाठवतो; खंडणीखोर दुकली ठाण्यात जेरबंद

Subscribe

ठाणे – भिवंडीतील एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकाने शाळेत अनधिकृत अनधिकृत बांधकाम केले आहे. त्याची तक्रार महानगरपालिकेत करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत, दोन लाखांची खंडणीची मागणी केली आणि ताडजोडीअंती ठरलेले एक लाख स्वीकारताना दिलीप बबन साठे उर्फ दिलीप पाटील (२९) व त्याचा साथीदार विकास राजेंद्र कांबळे (२३) या दुकलीला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडले. त्या दुकलीविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर अटक केली. तसेच त्यांना न्यायालयाने येत्या २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा राम मंदिराचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार? अमित शाहांकडून मोठा खुलासा

- Advertisement -

तक्रारदार राकेश शंकर शेट्टी हे भिवंडी, नारपोली बॉम्बे केंब्रिज स्कूल, या संस्थेचे संचालक असून त्यांच्या शाळेतील पाण्याच्या टाकीचे नुतनीकरण करण्यात आले होते. हे नुतनीकरण बेकायदा असून त्याबाबत महापालिकेत तक्रार करतो, असे सांगत अटकेतील दिलीप पाटील याने शेट्टी यांना धमकावले. त्याबाबत शेट्टी यांनी त्यांचे सचिव प्रदीप पाटील यांना दिलीप पाटील याला भेटून त्याच्याशी त्या बाबत चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार प्रदीप पाटील हे दिलीप पाटील याला भेटले. यावेळी, दिलीप पाटील याने प्रदीप पाटील यांना ”तुम्ही केलेले बांधकाम अनाधिकृत असून जर तुम्हाला हे बांधकाम नियमित करून घ्यायचे असेल तर तुम्ही मला दोन लाख रुपये द्या नाहीतर मी महानगर पालिकेमार्फत तुम्हाला नोटीस काढेन, असे धमकावून नोटीस थांबवण्यासाठी प्रदीप पाटील यांचेकडे दोन लाखांची मागणी केली.

हेही वाचा – मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे ११ तुकडे सापडले, तपासकार्यात सीबीआयची एन्ट्री

- Advertisement -

दरम्यान “पोलिसांना माहिती दिली तर तुमच्या जीवाचे बरे वाईट होईल” असे धमकावले. याबाबत पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांच्या माहितीनुसार प्रदीप पाटील यांनी दिलीप पाटील यांच्याशी तडजोडीची चर्चा केली. त्यावेळी पालिकेला तक्रार न करण्यासाठी एक लाख देण्याचे ठरले. तेच पैसे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये स्वीकारताना दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानुसार त्यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी अटक करत न्यायालयात हजर केले. त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले असून पाटील हा भिवंडी कामतघर तर कांबळे हा शेलारगांव येथील रहिवासी आहे. तसेच ते मूळचे उस्मानाबाद येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी एस नाळे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -