घरठाणेशाहनवाजला घेऊन गाझियाबादला पोलीस रवाना

शाहनवाजला घेऊन गाझियाबादला पोलीस रवाना

Subscribe

ताबा घेण्यासाठी गाझियाबाद पोलीस झाले होते ठाण्यात दाखल

 ऑनलाईन पध्दतीने धर्मांतर प्रकरणी मुंब्र्यातील बद्दो उर्फ शाहनवाज मकसुद खान (२३) या तरुणाला अलिबाग येथून मुंब्रा पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. त्यानंतर गाझियाबाद पोलिसांचे एक पथक ठाण्यात दाखल झाले होते. वरीष्ठ पोलीस अधिकारी विकास अग्निहोत्री यांच्यासह चार जणांच्या पथकाने शाहनवाजचा ताबा घेत, ते पथक तातडीने गाझियाबादला रवाना झाले. अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. दरम्यान अलिबाग येथून शाहनवाज याला अटक करताना त्याचा मोठा भाऊ त्याच्यासोबत होता. त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

गाझियाबाद येथील कविनगर पोलिस ठाण्यात धर्मांतर कायदा कलम 3,5(1) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाला अटक केली. त्यानंतर या प्रकरणात शाहनवाज याचा समावेश असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याचा शोध सुरू झाला. याचदरम्यान ठाणे शहर पोलीस दलाच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय कुंभार यांच्या पथकाने शाहनवाज याचा शोध घेणे सुरू केले. तसेच त्याचे नातेवाईक यांचे मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून शाहनवाज हा सुरुवातीला वरळी पोलिस ठाणे हद्दीत असल्याचा सुगावा लागला. त्यानुसार वरळी पोलिसांच्या मदतीने शोध घेतला. त्यावेळी शाहनवाज हा आलिबागला पळाले असल्याची माहिती पुढे आले. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी आपला मोर्चा अलिबागला वळून त्याला अलिबाग येथून मोठ्या शिताफीने अटक केली. याची माहिती मिळताच गाझियाबाद पोलिसांनी तातडीने त्याचा ताबा घेण्यासाठी मुंब्र्याकडे धाव घेतली. ते पथक आल्यानंतर सोमवारी शाहनवाज याला न्यायालयात हजर करून त्याचा ताबा घेतला. तसेच त्याला घेऊन ते पथक तातडीने गाझियाबाद येथे रवाना झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय कुंभार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -