घरthaneवीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास प्राधान्य द्या

वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास प्राधान्य द्या

Subscribe

स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची सूचना

वीज ग्राहक आणि लोकप्रतिनिधींच्या सेवाविषयक समस्या, तक्रारींचे प्राधान्याने निवारण करावे तसेच निर्धारित मानकाप्रमाणे तत्पर ग्राहक सेवांवर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कपंनीचे संचालक मा. विश्वास पाठक यांनी वीज कंपन्यांच्या अधिकारी व अभियंत्यांना दिले. ठाणे जिल्हा अंतर्गत विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात मंगळवारी (31 ऑक्टोबर) आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार किसन कथोरे आणि संजय केळकर, महावितरणचे मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद भादीकर, महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे तसेच महावितरण, महापारेषण, मेडा या विद्युत क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे अधिकारी व अभियंते यावेळी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील महावितरणच्या भांडुप आणि कल्याण परिमंडलातील ठाणे, वाशी, कल्याण एक आणि दोन या चारही मंडलातील महसूल, वसुली, थकबाकी, वीज गळती, त्यावरील उपाययोजना, पायाभूत सुविधा, वीज पुरवठा यंत्रणेची सद्यस्थिती आणि आगामी नियोजन यासंदर्भात बैठकीत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वीज ग्राहकांच्या प्रलंबित समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देतानाच मा. पाठक यांनी महावितरणने केलेल्या कामाचे कौतुक केले. या बैठकीला विधीज्ञ चेतन पाटील, भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, महापारेषणचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, मेडाचे मुख्य अभियंता डी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह चारही मंडलातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व अन्य अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -