घरठाणेठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव

Subscribe

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेत ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मंगळवारी आयोगाकडे आयुक्तपदासाठी तीन नावांचे पर्याय पाठवले होते. सरकारने पाठवलेल्या तीन नावांपैकी केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाणे महानरपालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

उल्हासनगर महापालिकेतील लेखाधिकारी समवेत दोन उपयुक्तांची बदली
उल्हासनगर  महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांची मंगळवारी निवडणूक आयोगच्या आदेशानुसार बदली करण्यात आली असून आज मनपा आयुक्त अजीज शेख यांनी बुधवारी बदली झालेले उपआयुक्त अशोक नाईकवाडे, प्रियंका राजपूत व सहायक लेखा अधिकारी दिपक धनगर यांना निरोप दिला आहे. उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर वर्ग-१ व २ च्या पदाचा पदभार देण्याची वेळ मनपा प्रशासना वर आली आहें अतिरिक्त आयुक्त, २ उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, शहर अभियंता, पाणी पुरवठा व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, कर निर्धारक आदी महत्वाचे पदे रिक्त असल्याने मनपा आयुक्तानी प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांना पाठविण्यात यावे अशी शासनाला निवेदन दिले आहे.
दरम्यान मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रियांका राजपूत यांना तीन वर्ष पूर्ण झाल्याने, निवडणूक आयुक्तांच्या आदेशाने त्यांच्या बदल्या झाल्या आहे. तर सहायक लेखा अधिकारी दिपक धनगर यांची पदोन्नती देण्यात आल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना महापालिका सभागृहात आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते निरोप देण्यात आला. यावेळी उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, शहर अभियंता संदीप जाधव, महापालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, सहायक आयुक्त गणेश शिंपी, सहायक सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे यांच्यासह विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -