मायलेकांची ठाणे पोलिसांनी घडवून आणली पुनर्भेट

 शहरातील प्रत्येक उड्डाणपुलांवर घेतला शोध

police
पोलीस

आपल्या लहान- बहिणीला घेऊन आईची नजर चुकवून भटकत असताना, त्या दोघांची शहरातील गर्दीत चुकामुक झाली. रडत ते दोघेही त्यांच्या आईला शोध असताना भाऊ ठाणेनगर आणि बहीण नौपाडा पोलिसांना मिळून आले. यावेळी दोघांनी पत्ता सांगताना फक्त ब्रीज खाली राहतो एवढेच सांगितले. पण, नेमका हा पूल कोणता हे ५ आणि ३ वर्षीय भावंडांना सांगता येत नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी शहरातील प्रत्येक ‘ब्रीज’ ला भेट दिली. अखेर कळवा येथील ब्रीजखाली त्या मायलेकरांची पुनर्भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले.

नौपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हट्टेकरहे १ जानेवारीला रात्री ९.३० वाजण्याचा सुमारास तलावपाळी येथे कर्तव्यावर होते. याचदरम्यान तीन वर्षीय चिमुरडी रडत आईच्या शोधात असल्याचे दिसून आले. येथून तिचा आईचा शोध सुरू झाला. याचदरम्यान ठाणेनगर पोलिसांना एक पाच वर्षीय मुलगा आईच्या शोधात रडताना मिळून आला. ते दोघेही पत्ता सांगताना ‘ब्रिजखाली’ एवढेच सांगत आहेत. म्हणून पोलीस नाईक शागलूलु यांनी ठाणेनगर पोलीस स्टेशन येथे वॉटसअप द्वारे व्हिडीओ कॉल केला हा कोण आहे असे विचारले.

तेव्हा तिने भाऊ असल्याचे सांगितले. तेथून त्या भावंडांच्या आई- वडिलांचा शोध सुरू झाला. शहरातील प्रत्येक ब्रीज त्या मुलांसाठी पोलिसांनी पालथा घातला. रात्री एक ते दीड वाजले होते. कळवा येथे रात्री २ वाजता एका ब्रिजचे खाली त्या मायलेकरांची भेट झाली.  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि त्यांच्या साथीदारांनी हरवलेल्या आई. मुलांची भेट घालून दिल्यामुळे नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ कौतुक करून अभिनंदन केले.

”  रडत आईच्या शोधत असलेले त्या चिमुरडीला तिची आई मिळवून देणे हे लक्ष ठेवले होते. तिने दिलेल्या तुटक पत्तामुळे तिचा आईचा शोध घेणे खूपच अवघड होते. त्यातच तिचा भाऊ ही ठाणेनगर पोलिसांना मिळाल्याने मग सर्व ब्रीजला भेट घडवून आणण्याचे ठरवले. अखेर त्या शोधमोहिमेला यश आले. दुदैवी गोष्टी म्हणजे त्या भावंडांना वडील नाहीत आणि हक्काचे घर ही नसून ते ब्रीज खाली राहत आहेत ”
– सुहास हट्टेकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे.