शहापुरातील व्यापारी रमेश अग्रवाल गोळीबार प्रकरणी संशयित अटकेत

पूर्व नियोजित कट असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे

Shahapur trader Ramesh Agarwal arrested in shooting case

दोन  दिवसांपूर्वी राईसमिलचे मालक रमेश अग्रवाल यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी शहापूर पोलिसांनी एक संशयिताला अटक केली आहे. पूर्व नियोजित कट असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.शहापूरातील राईसमिलचे व्यापारी रमेश अग्रवाल यांच्यावर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केेल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे परिसरात खळबळ माजली असून याप्रकरणी फरार झालेल्या हल्लेखोरांचा शहापूर पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे.

 

शहापूर पोलिसांना याप्रकरणी काही धागेदोरे हाती लागले असून एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रमेश अग्रवाल यांच्यावरील हल्ला हा पूर्व नियोजित कट असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात आला असून याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, शहरातील गंगारोड भागातील राईसमिल बाहेर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली असून शहापुरात खबरदारी म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.