घरताज्या घडामोडीCorona: पालिका रुग्णालयांसाठी ३ हजार बेडची खरेदी करणार

Corona: पालिका रुग्णालयांसाठी ३ हजार बेडची खरेदी करणार

Subscribe

मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. सुदैवाने मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर विविध उपाययोजना करून त्यावर काहीसे नियंत्रण मिळविल्याने रुग्ण संख्येत काहीशी घट झाली आहे. मात्र ज्या पद्धतीने कोरोनाची दुसरी लाट उसळली ते पाहता आणि रुग्णालयात बेडची कमतरता पाहता पालिकेने विविध रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यासाठी ३ हजार नवीन बेडची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ९ कंत्राटदारांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला असून यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पालिका आयुक्त इक्बाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या आदेशाने मुंबईतील पालिकेच्या सर्व रुग्णालयांची क्षमता वाढविण्यात येत आहे. तसेच पालिकेच्या जंबो कोविड सेंटरची क्षमताही वाढविण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक साधन, सामग्री खरेदी करण्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया केली. त्यामध्ये ९ कंत्राटदारांनी त्यास प्रतिसाद दिला आहे.

- Advertisement -

पालिका, जंबो कोविड सेंटर आणि विविध रुग्णालयांसाठी ३ हजार बेडची खरेदी करणार आहे. मे.जे.डी. हेल्थकेअर या कंत्राटदरकडून ३ हजार बेड खरेदी करणार आहे. त्यासाठी एका बेडसाठी ६ हजार ३७० रुपये याप्रमाणे १ कोटी ९१ लाख १० हजार रुपये कंत्राटदाराला मोजण्यात येणार आहेत.

बेड लॉकर, आय. व्ही.रॉडचीही खरेदी

तसेच, मुंबई महापालिका मे.जे.डी. हेल्थकेअर याच कंत्राटदरकडून २ हजार बेड लॉकरची सुद्धा खरेदी करणार आहे. त्यासाठी एका बेड लॉकरकरिता ४ हजार ७५० रुपये याप्रमाणे ९५ लाख रुपये कंत्राटदाराला मोजण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, मे. व्ही.जमनादास एन्ड कंपनी या कंत्राटदाराकडून ३ हजार आय.व्ही. रॉडची खरेदी करण्यात येणार आहे. त्याकरिता, एका आय. व्ही. रॉडसाठी १ हजार १८ रुपये याप्रमाणे ३० लाख ५४ हजार रुपये मोजण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत ५,६५० रुग्णांची कोरोनावर मात, तर २४ तासात ४ हजार १९२ कोरोनाबाधितांची नोंद


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -