घरठाणेउल्हासनगरात १० हजार भटक्या श्वानांचे निर्बीजिकरण

उल्हासनगरात १० हजार भटक्या श्वानांचे निर्बीजिकरण

Subscribe

उल्हासनगर । उल्हासनगर महानगर पालिकेच्यावतीने भटक्या श्वानांवर निबिर्र्जीकरणाची मोहिम सुरू करण्यात आली आहे. मागील एका वर्षात पालिकेकडून दहा हजार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. शहरात जवळपास ६० हजारांपेक्षा जास्त भटके कुत्रे आहेत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.
उल्हासनगर महानगर पालिकेने शहरातील भटक्या श्वानांना नियंत्रणात आणण्यासाठी वेस्ट इनिमल कंपनाला कंत्राट दिले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शहरातील दहा हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. निर्बिजीकरणाची प्रक्रिया सतत पाच वर्षे सुरू ठेवल्यास शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येऊ शकते. उल्हासनगरात सध्या मनपा मुख्यालयामागे निर्बीजीकरणाची केंद्र सुरु करण्यात आले आहे. उल्हासनगरात आता पर्यंत आठशेपेक्षा अधिक नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतला आहे. परंतु यात कुणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -