घरठाणेसंभाव्य धरणासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद करा - ठाणे काँग्रेस

संभाव्य धरणासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद करा – ठाणे काँग्रेस

Subscribe

नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापलिकेचे देखील हक्काचे असे धरण असावे, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, अशी मागणी ठाणे काँग्रेसने केली आहे.

नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापलिकेचे देखील हक्काचे असे धरण असावे, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, अशी मागणी ठाणे काँग्रेसने केली आहे. दरम्यान या संभाव्य धरणासाठी ठाणे महापालिकेकडून २०२१-२२ या अर्थसंकल्पात सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, असेही काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर यांनी ठाणे पालकमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर आणि आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पालकमंत्र्यांनी ठाणेकरांना पाणी पुरवण्याचे पुण्यकर्म करावे, असेही निवेदनात नमूद केले आहे. ठाणे महापालिका हद्दीची लोकसंख्या जवळजवळ ३० लक्ष एवढी झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीत वागळे इस्टेट ते घोडबंदर रोडवरील गायमुख व दिवा ते कळवा असा महापालिकेचा व्याप आहे.

ठाणे महापालिका एमआयडीसी, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर संस्थांकडून ठाणे महानगराचा पाणीपुरवठा होत आहे. भविष्य काळात मुंबई महापालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थांकडून ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येला वाढता पाणीपुरवठा लागणार आहे. त्यासाठी या संस्था कितपत सक्षम असतील, याचा भरवसा आज देता येणार नाही. नवी मुंबई या शहराच्या दूरदृष्टीमुळे महापालिकेने हे धरण बांधून त्या धरणामधून पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध करुन घेतली आहे. म्हणून नवी मुंबई महापालिका पाणी पुरवठ्याबाबत स्वत:च्या पायावर उभी आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे महापालिका, भिवंडी महानगरपालिका, मिरा भाईंदर महापालिका या तीन महापालिकांचे मिळून एकत्रित पाणी वितरणाची व्यवस्था आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापलिकेचे देखील स्वतःचे धरण असावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

पालकमंत्री त्यांच्या शब्दाला प्रचंड मान असून त्यांचा शब्द मुख्यंत्रीही टाळू शकत नाही. शहापूर तालुक्यात शाई हे धरण शासनाने प्रस्तावित केले आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या स्वप्नवत क्लस्टर योजना पुर्णत्वास जात असताना ठामपा कार्यक्षेत्रात पाण्याची गरज जवळ-जवळ तीन पटीने वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी पाणी पुरविण्याचे पुण्य कर्म मिळवावे.
– संजय घाडीगावकर, माजी नगरसेवक

दरम्यान, या सांभाव्य धरणाच्या अपेक्षेने ठाणे महापालिकेकडून २०२१-२२ या अर्थसंकल्पात सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी घाडीगांवकर यांनी केली आहे. तर क्लस्टर योजनेचे हे उंच मनोरे होण्याअगोदर सामान्य माणसाच्या मनात या उंच मनोऱ्यांना रोज पाणीपुरवठा कोण करणार व पाणी कसे उपलब्ध होणार, असा प्रश्न आहे. अतिशय कार्यमग्न अगदी कोव्हिड काळातही नागरीकांचे काम थांबू नये म्हणून काम करणारे दूरदृष्टी लाभलेल्या पालकमंत्र्यांना ही छोटीशी सूचना आहे. तसेच शाई धरण बांधून पालकमंत्र्यांनी ठाणेकरांचे पुण्य मिळवावे. ठाणे महापालिका हद्दीतील नागरीकांसाठी वेगळ्या धरणाची आवश्यकता आहे. विद्यमान पालकमंत्री अगदी मुख्यमंत्र्यांना वेठीस धरुन हे काम ठाणेकरांसाठी करुन घेतील, असा विश्वास यावेळी घाडीगांवकर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – 

राज्यपाल कंगणाला भेटले, पण आमच्या शेतकऱ्यांना भेटले नाहीत – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -