घरठाणेबुलेट ट्रेनबाबतचा प्रस्ताव ठाणे मनपात चर्चेविनाच मंजूर

बुलेट ट्रेनबाबतचा प्रस्ताव ठाणे मनपात चर्चेविनाच मंजूर

Subscribe

दीड वर्षांपासून मिळत नव्हती संमती

बुलेट ट्रेनच्या मार्गासाठीचा ठाण्यातील जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव गेल्या दीड वर्षांपासून रखडला होता. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये गेल्या दीड वर्षांपासून हा प्रस्ताव ताटकळला होता. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या ठाण्यातील मार्गाचे काम पुढे सरकत नव्हते. मात्र, बुधवारी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अचानक हा विषय चर्चेला आला आणि कोणत्याही चर्चेविनाच तो संमत करण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग ठाणे पालिका क्षेत्रातील शिळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून जाणार आहे. तसेच म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) काही वर्षांपासून राबवायला सुरुवात केली आहे. यासाठी खासगी आणि सरकारी अशा दोन्ही मालकी हक्काच्या जमिनींचे अधिग्रहण सुरू आहे. खासगी जमिनींचे अधिग्रहण काही वाटाघाटींनंतर होत असताना ठाणे महानगरपालिकेच्या मालकीची जागा मात्र मंजुरीविना अडकून पडली होती. प्रकल्पासाठी संपादित होणार्‍या खासगी जमिनींसाठी प्रति हेक्टर नऊ कोटी मोबदला दर निश्चित करण्यात आला होता. त्यानुसारच अधिग्रहण प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

- Advertisement -

या प्रकल्पासाठी महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील ३ हजार ८४९ चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे. ही जागा प्रकल्पासाठी देण्याची मागणी एनएचएसआरसीएलने पालिकेकडे दोन वर्षांपूर्वी केली होती. त्यासाठी ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदलाही ठरला. त्यानुसार मोबदला घेऊन ही जागा हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. मात्र, गेल्या वर्षभरात तीन वेळा हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आला असता, सत्ताधारी शिवसेनेने तो तहकूब ठेवला. अखेर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव दप्तरी दाखल झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -