घरठाणेकर आणि दरवाढ नसलेला ठामपाचा अर्थसंकल्प

कर आणि दरवाढ नसलेला ठामपाचा अर्थसंकल्प

Subscribe

* २७५५.३२ कोटींचा मूळ अंदाजपत्रक सादर, * जुन्या प्रकल्पांना पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न

पुढच्या वर्षी होणार्‍या ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, या अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा न करता, जुने प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. तसेच सादर झालेल्या २७५५.३२ कोटींचा मुळ अंदाजपत्रकात कोणतीही कर वाढ किंवा कोणतीही दर वाढ करण्यात आलेली नाही. तसेच भांडवली खर्चात ४९ टक्के कपात लावण्यात आली असून, उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला आहे. तसेच गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १२०० कोटींनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्थायी समिती सभागृहात सभापती संजय भोईर यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करत तो अर्थसंकल्प स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवला आहे. ठामपा २०२०-२१ चे मुळ अंदाजपत्रक ४०८६ कोटींचे होते. परंतु कोरोना व त्याच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सुधारीत अंदाजपत्रक २८०७.०३ कोटींचे तयार करून २०२१-२२ चे २७५५.३२ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले.

- Advertisement -

या अर्थसंकल्पात उत्पन्न वाढीवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु कोरोनामुळे पालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याने महापालिकेने प्रमुख उत्पन्न स्त्रोतांकडून अपेक्षित असलेले उत्पन्नही कमी करण्यात आले आहे. त्यानुसार मालमत्ताकरापोटी ६९३.२४ कोटी, विकास व तत्सम शुल्कपोटी ३४२ कोटी, स्थानिक संस्थाकरापोटी ११५२.७० कोटी, पाणी पुरवठा आकारपोटी २०० कोटी, अग्निशमन दल ९८.२६ कोटी, स्थावर मालमत्ता २१.०५ कोटी, जाहीरात फी २२.३७ कोटी, अनुदानापोटी १०७.६७ कोटी, कर्जापोटी १६४.४९ कोटी असे धरून आरंभीची शिल्लक ३९२.७८ कोटीसह एकूण अंदाजपत्रक २०८७.०३ कोटी व २०२१-२२ मध्ये आरंभीची शिल्लक ५६ लाखांसह २७५५.३२ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

या अर्थसंकल्पात खर्चावर नियंत्रण करताना वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट, पीआरटीएस, जलवाहतूक, सार्वजनिक बांधकामाचा आप्तकालीन निधी, गटार साफसफाई, मेंटल हॉस्पीटल परिसरात क्रीडा संकुल आदींसह इतर महत्वाच्या प्रकल्पांना यंदाच्या अर्थसंकल्पात कात्री लावण्यात आली आहे. त्यानुसार भांडवली खर्चासाठी २१५४.०२ कोटी प्रस्तावित होते. परंतु कोरोनामुळे याला कात्री लावून १०५७.३६ कोटींवर आणण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -