ठाणे शहर ठरतेय जिल्ह्यात कोरोनाचे हॉटस्पॉट

नव्या ४० रुग्णांची दिवसभरात भर, एकाचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसू लागली आहे. त्यातच ठामपा हे जिल्ह्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरते की काय अशी भीती या आकडेवारी वरून दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २८ रुग्ण हे ठामपा हद्दीत नोंदवले गेले आहे. त्यातच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बाब ही पुढे आली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या थेट १३३ इतकी झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना हळूहळू नाहीतर झपाट्याने वाढताना दिसून आला.

बुधवारी अचानक रुग्णांची संख्या २४ झाली होती. त्यातच गुरुवारी ती संख्या ४० वर पोहोचली. त्यातच एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठामपा हद्दीत २८ रुग्ण सापडल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ८५ झाली आहे. त्यातच एकाचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीत ३, नवीमुंबई ७, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी १ तर उल्हासनगर,मीरा भाईंदर आणि कुळगाव बदलापूर येथे एक ही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

तीन महिन्यांनी ठाण्यात एकाचा मृत्यू
२०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात अखेर कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी ठामपा हद्दीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.