घरठाणेनव्या जागेतील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुविधा ही सुपर स्पेशालिटीच

नव्या जागेतील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुविधा ही सुपर स्पेशालिटीच

Subscribe

पुढच्या आठवड्यात होणार ओपीडी कार्यान्वित

 ठाणे जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहत असून त्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर कामाला जोरदार सुरुवातही झाली आहे. मात्र तात्पुरते जुने रुग्णालय हे वागळे इस्टेट येथील आरोग्य विभागाच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. ते काम करताना तेथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सेवा- सुविधा ही देण्याचा पुरेसा प्रयत्न केला जात आहे. तर पुढील आठवड्यात बाह्यरुग्ण ( ओपीडी) सेवा कार्यान्वित होत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भूमिपूजनाचा झाल्यानंतर लगेचच त्याठिकाणी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र दरम्यानच्या वेळेत रुग्णांना त्रास होणार नाही, याची दक्षता जिल्हा रुग्णालयाने घेत, अडोशाच्या जागेत महत्वाचे वैद्यकीय कक्ष सुरू ठेवून रुग्णसेवा चालू ठेवण्यात आली .आता संपूर्ण जिल्हा रुग्णालय वागळे इस्टेट आरोग्य विभागाच्या जागेत हलवण्यात आले आहे. रुग्णालयाचे काम जोरात सुरू असून ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. रुग्णालयात सर्व कक्ष अद्यावत करण्यात येत आहेत. या मध्ये अतीदक्षता विभागात ४० खाटांची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय डायलिसिस १५, नवजात बालकांच्या अतिदक्षता विभाग २४ खाटा, पोषण पुनर्वसन केंद्रात १०, प्रसूती कक्षासाठी ३५ तर जनरल वॉर्डसाठी ३५० खाटांची तयारी केली आहे. तर रक्तपेढीचे काम पूर्ण झाले आहे. त्यातच नेत्र रुग्णालय, शस्त्रक्रिया कक्ष आदींचे पूर्णत्वास येत आहे. तर सिटीस्कॅनचे काम सुरू असून शवागृहाचे काम सुरू आहे. पण, बाह्य रुग्ण सेवेचे  काम पूर्ण होत असल्याने पुढील आठवड्यात बाह्य रुग्ण सेवा सुरू होईल असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. उर्वरित कामे ही तातडीने पूर्ण करून तातडीने त्या सुविधा देण्यावर विशेष लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.
” रुग्णांना चांगले उपचार मिळावेत या हेतूनं स्थलांतरित केलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात  उत्तम सोयीसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. त्यातच पुढच्या आठवड्यात बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवा सुरू करण्याचा मानस आहे. बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात एकाच ठिकाणी वैद्यकीय अधिकारी रुग्णांना सेवा देतील अशा पद्धतीने त्याची उभारणी करण्यात आलेली आहे. “- डॉ. कैलास पवार ,जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -