Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई राज्यात 18 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; उपायुक्त बालसिंग राजपूत गुन्हे शाखेत

राज्यात 18 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; उपायुक्त बालसिंग राजपूत गुन्हे शाखेत

Subscribe

मुंबई : राज्य पोलीस दलातील नऊ आयपीएस अधिकार्‍यांच्या बुधवारी गृहविभागाने बदल्या केल्या आहेत. बदल्याचे आदेश बुधवारी सायंकाळी जारी करण्यात आले. नागपूरच्या राज्य राखीव बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे यांची पुण्याच्या राज्य राखीव बल येथे बदली करण्यात आली आहे. (Internal transfers of nine Deputy Commissioners of Police in Mumba)

महेंद्र पंडित यांची मुंबईतून कोल्हापूर, शैलेश बलकवडे कोल्हापूर येथून पुण्यातील राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक, योगेशकुमार गुप्ता यांची मुंबईतून नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधिक्षक, मोनिका राऊत यांची अकोला येथून नाशिक शहर, अभय डोंगरे यांची जालना येथून अकोला, अक्षय शिंदे यांची जालना येथून नागपूर लोहमार्ग, जयंत मीना यांची नांदेड येथून पुणे एटीएस, तुषार दोषी यांची पुणे एटीएस येथून जालना येथे बदली दाखविण्यात आली आहे.

- Advertisement -

मंगळवारी (23 मे) रात्री पोलीस आयुक्तांनी मुंबईतील नऊ पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. परिमंडळ चारचे प्रविण मुंढे यांची परिमंडळ एक, गुन्हे शाखेचे मोहीतकुमार गर्ग यांची परिमंडळ दोन, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची परिमंडळ चार, प्रकटीकरण एकचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ नऊ, बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या दत्ता नलावडे यांची परिमंडळ दहा, अमोघ गावकर यांची गुन्हे शाखा प्रतिबंधक, महेश रेड्डी यांची परिमंडळ दहाहून मुख्यालय, परिमंडळ एकचे हरी बालाजी यांची विशेष शाखा एक आणि बालसिंग राजपूत यांची सायबर सेल विभागातून गुन्हे शाखा प्रकटीकरण विभागात बदली करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे यांतील काही अधिकाऱ्यांच्या वर्षभरापूर्वी बदल्या करण्यात आलेल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच येत्या काही दिवसांत या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रमाणपत्र प्रती अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आलेले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -