घरठाणेहे दडपशाहीचेच सरकार

हे दडपशाहीचेच सरकार

Subscribe

महिला काँग्रेसचा राज्य सरकारला घरचा आहेर

हे सरकार दडपशाहीचेच सरकार आहे. हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावर जास्त काय बोलणार, असे वक्तव्य करत काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी गुरुवारी ठाण्यात केले. यावेळी त्यांनी नाव न घेता, त्यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. ठाण्यातून महिला कॉंग्रेसच्या वतीने भाजप सरकार विरोधात पदयात्रेला सुरुवात झाली असून महागाई आणि महिला अत्याचार विरोधात मोदी सरकार जोपर्यंत आहे. तोपर्यंत महिला काँग्रेस कडून विरोधात सुरू राहणार आहे.

पेट्रोल डिझेलच्या दारात वाढ झाली असून पेट्रोलचे दर १०० रुपयाच्या आसपास पोहोचले आहे. या वाढत्या महागाईच्या व केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी महिला काँग्रेसच्यावतीने पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ही पदयात्रा ठाणे काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली. याप्रसंगी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे, ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह ठाणे काँग्रेस महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

पेट्रोल डिझेल यांचे दर वाढले असून याच्या निषेधार्थ काँग्रेस महिला रस्त्यावर उतरून त्याचा निषेध नोंदवीत आहे. जो पर्यंत मोदी हटाव होत नाही, तो पर्यंत महाराष्ट्रातील महिला काँग्रेस निषेध नोंदविणार असल्याचे प्रदेशाध्यक्षा सव्वालाखे यांनी दिली. तसेच महिला काँग्रेस च्या वतीने १०० दिवसांचा अजेंडा आखला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जात, या महागाईच्या विरोधात पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचदरम्यान, शिवजयंतीला निर्बंध घालण्यात आले आहेत, तर दुसरीकडे मात्र काँग्रेसची अशाप्रकारे पदयात्रा निघत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी महिला प्रदेशाध्यक्षा सव्वालाखे यांना छेडले असता, त्यांनी हे सरकार दडपशाहीचे सरकार आहे, हे तुम्हाला माहित आहे. त्यावर मी जास्त काय बोलणार, जनतेला ही माहिती आहे. त्यावर न बोललेलेच बरे, असे बोलत त्यांनी नाव न घेता, राज्यातील ठाकरे सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

पदयात्रेत सोशल डिस्टन्सचे तीनतेरा
एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ ओढवते का? या विवंचनेत आहे. तसेच सरकारकडून मास्क परिधान करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येत आहे. असे असताना, गुरुवारी महिला काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेत सोशल डिस्टन्सचे तीनतेरा वाजल्याचे पाहण्यास मिळून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -