घरठाणेठामपाच्या अतिक्रमण उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची बदली मुंबईत

ठामपाच्या अतिक्रमण उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची बदली मुंबईत

Subscribe

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची अचानक मुंबई नगर संचालक सहाय्यक आयुक्त पदी बदली झाली आहे. कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून त्यांची बदली करण्यात आली असल्याचे कारण देण्यात आले असले तरी त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच बदली झाली आहे. प्रशासनातीलच काही अधिकार्‍यांच्या नाराजीमुळे ही बदली करण्यात आली असल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. तर अतिक्रमणचा पदभार अद्यापही कोणाला दिलेला नाही.

ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आधीपासूनच वादाच्या भोवर्‍यात आहे. यापूर्वी उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा कार्यभार देण्यात आला होता. मात्र, बुरपुल्ले यांच्याकडून तो कार्यभार काढून घेऊन त्या जागी शासनाकडून आलेल्या अश्विनी वाघमळे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर काही अधिकारी वर्गात नाराजी पसरली होती. त्यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामांवर काही प्रमाणात कारवाई देखील सुरू झाली होती.

- Advertisement -

तर तत्कालीन आयुक्तांच्या कार्यकाळात झालेल्या अनधिकृत बांधकामाचा अहवाल तयार करण्याचे काम देखील त्यांच्याकडे होते. हा अहवाल अंतिम टप्प्यात असताना त्यांची आता अचानक बदली झाली असून प्रशासकीय अधिकार्‍यांच्या नाराजी नाट्यामुळे ही बदली झाली आहे का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे.

आपल्याला कुठेही काम करायचे आहे. तसेच कामाच्या बाबतीत आपण प्रामाणिक भावनेनेच काम केले आहे.
– अश्विनी वाघमळे, उपायुक्त, ठामपा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -