घरठाणेलोकलवर दगडफेक, अज्ञात इसमांचा शोध सुरू

लोकलवर दगडफेक, अज्ञात इसमांचा शोध सुरू

Subscribe

कल्याण । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कसाऱ्याकडे धावणाऱ्या लोकलवर अज्ञात इसमाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत दोन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना टिटवाळा खडवली दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. झोपडपट्टी परिसरातून ही दगडफेक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईकडून कसाऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलवर खडवली स्थानक येण्यापूर्वी दगडफेक झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. बाहेरून फेकले गेलेले दगड दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना लागल्याने ते किरकोळ जखमी झाले. या घटनेची प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. मात्र जखमीनी तक्रार देण्यास नकार दिल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकला नसला तरीही यासारख्या उपद्रवींचा उपद्रव रोखण्यासाठी रेल्वेकडून या अज्ञाताचा शोध सुरू असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनचे सीनियर पोलीस इन्स्पेक्टर पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले. दरम्यान खडवली रेल्वे स्थानकाआधी रेल्वे लाइन लगत असलेल्या झोपडपट्टीतून ही दगडफेक झाल्याची शक्यता व्यक्त केल्याच्या दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी संपर्क साधला असता सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -