घरठाणेप्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशकांच्या नाव, पत्त्यासह प्रतींची संख्या आवश्यक

प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशकांच्या नाव, पत्त्यासह प्रतींची संख्या आवश्यक

Subscribe

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे :  लोकसभा निवडणुकीसाठी छपाई करण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशक यांच्या नाव पत्त्यासह त्यावर संख्या असणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रिंटींग प्रेस ने काम करावे, असे निर्देश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

प्रचार साहित्य छापून घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराकडून दोन ओळखीच्या व्यक्तींच्या सह्यांसह दोन प्रतीमध्ये स्वत:चे घोषणापत्र प्रिंटर्सने घेणे आवश्यक आहे. त्याबरोबरच या घोषणापत्राची एक प्रत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर छपाई करण्यात आलेल्या प्रचार साहित्यांवर मुद्रक, प्रकाशक यांच्या नाव पत्त्यासह छपाई करण्यात आलेल्याची संख्या द्यायली हवी. हे न दिल्यास संबंधित प्रिंटींग प्रेस मालकाला सहा महिने तुरुंगवास, दोन हजार दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.

- Advertisement -

प्रिंटींग प्रेस चालक-मालकांनी या नियमाचा काटेकोरपणे अवलंब करावा. सविस्तर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करुन त्यावर अंमलबजावणी करावी. कोणतीही चूक होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -