ठाण्यातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील उन्नतीकरण व मजबुतीकरणची कामे हाती घेण्यात आलेले काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवार २७ जानेवारी २०२३ रोजी एम आयडीसीच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा नियमित सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सांगण्यात आले आहे.

TMC to cut off water supply twice a month in Thane districtयामुळे दिवा, खर्डी,पडले, देसाई, खिडकाळी, डायघर, डावले, भोलेनाथ – सिबलीनगर, कौसा, मुंबा कळवा, गणपतीपाडा विटावा कोलशेत, नेहरूनगर इ. ठिकाणचा पाणी पुरवठा नियमित सुरू राहणार आहे याची नोंद घ्यावी.

 


हेही वाचा :

ठाण्यातील काही भागांत उद्या पाणीपुरवठा बंद